अहमदनगर दि.११ डिसेंबर
अमर नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तारीक कुरेशी यांनी अहमदनगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांच्या विरुद्ध अवैद्य संपत्ती जमवुन भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे अर्ज देऊन बोरगे यांची चौकशी करावी अशी मागणी केली होती. यानंतर वृत्तपत्रे आणि सोशल मीडिया वर आलेल्या बातम्यांनंतर बोरगे यांनी आशा बातम्या खूप येत असतात आणि आरोप होत असतात माझी वर पर्यंत ओळख आहे तारीक कुरेशी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करील असे अनिल बोरगे यांनी त्यांच्या निकटवर्ती यांच्याशी बोलताना सांगितल्याचा आरोप तारिक कुरेशी यांनी केला असून अनिल बोरगे यांनी आपल्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करू शकतात. त्यामुळे माझ्या विरोधात आलेल्या तक्रांरीची शहानिशा करावी व खोटे गुन्हे नोंदवून घेऊ नये अशा मागणीचे निवेदन तारीक कुरेशी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
मनपा आरोग्य अधिकाऱ्यांची फेर चौकशी करावी
तसेच तारिक कुरेशी यांनी मुंबई येथील आरोग्य आयुक्तांकडे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांच्या फेर चौकशीची मागणी केली आहे. आरोग्य आयुक्तालया मार्फत अहमदनगर महानगरपालिकेतील राष्ट्रीय आरोग्य अभियान 2019 ते 2021 बाबत संबंधित कार्यालया मार्फत दिनेश शिंदे व शेरे यांनी चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करुन महापालिका आरोग्य अधिकारी यांची चौकशी करण्यात आली होती मात्र त्यांच्याबाबत अजूनही आमच्या तक्रारी असल्याने त्यांची फेर चौकशी करण्याच्या मागणी तारीक कुरेशी यांनी केली आहे.