अहिल्यानगर दिनांक 11 ऑक्टोबर
विधानसभा निवडणुकीचे आचारसंहिता दोन ते तीन दिवसांवर लागण्याची शक्यता असून नगर शहर मतदारसंघात अध्यापही महाविकास आघाडी कडून कोण या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत आहे. महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनही पक्षांमधील इच्छुक आपल्याच पक्षाला उमेदवारी मिळेल याचा दावा करत आहेत. तर अनेक इच्छुक सध्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत असून मतदारांच्या भेटीगाठी इच्छुक उमेदवारांनी सुरू केल्या आहेत.
मात्र मध्यंतरी काही बातम्या पसरल्या आणि माजी महापौर राहिलेले एक युवा नेते पुन्हा नगर शहरात राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा झडू लागल्या आणि त्यांच्या समर्थकांनी एक मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीची तयारी करा असा संदेश कार्यकर्त्यांना दिला गेला. 12 ते 13 वर्षांपासून हे नेते बाहेर असल्यामुळे आता त्यांचा राजकारणात कोणत्या पक्षाद्वारे प्रवेश होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरण आणि दोन शिवसैनिकांच्या निर्घृण हत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर आणि जिल्हा बंदी असल्यामुळे युवक नेते अनेक वर्षांपासून जिल्ह्या बाहेरच आहेत मात्र आता पुन्हा त्यांना नगर शहरात येण्याचे वेध लागले असून त्यासाठी त्यांची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आह. ते पूर्वश्रमीचे काँग्रेसचे असल्यामुळे मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते चाचपणी करत असल्याच्या बातम्या सध्या चर्चेत असल्या की त्यांचे समर्थक मुद्दामून वावड्या उठवत आहेत हे कळायला तयार नाही मात्र महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षातील नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा त्यांना विरोध असेल आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दोन शिवसैनिकांची निर्घृण हत्या प्रकरणातही त्यांचे नाव घेतले होते त्यामुळे आता तेच शिवसैनिक पुन्हा त्या युवा नेत्याच्या पाठीशी उभा राहणार का ? आपल्या सहकाऱ्यांचा निर्घृण खून शिवसैनिक विसरू शकतील का ? त्यामुळे शहरात सध्या सुरू असलेली चर्चा ही चर्चाच राहील की त्यामध्ये काही वेगळा ट्विस्ट येईल हे येणाऱ्या दोन-चार दिवसातच कळणार आहे.