अहिल्यानगर दिनांक १० ऑक्टोबर
‘तुला बंगला घेऊन देतो, तुझ्या मुलाला नोकरी मिळवून देतो,’ असे आमिष दाखवून श्रीरामपूर, मुंबई, दिल्ली आदी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याच्या महिलेच्या तक्रारीवरून माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक भानुदास मुरकुटे यांना पोलिसांनी अटक केली होती .
अटक केल्यानंतर पोलिसांनी माजी आमदार मुरकुटे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तब्बल सात तास चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. आज माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची पोलीस कस्टडी संपल्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर आणि भानुदास मुरकुटे प्रकृतीचे कारण आणि तसे डॉक्टरांचे रिपोर्ट सादर केल्यानंतर न्यायालयाने भानुदास मुरकुटे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज न्यायालयात भानुदास मुरकुटे यांच्या वतीने एडवोकेट महेश तवले, एडवोकेट सुनील पाटील आणि एडवोकेट संजय वालेकर यांनी काम पाहिले.