पतंग उडवण्याच्या कारणावरून अहमदनगर शहरातील जे जे गल्ली, घास गल्ली भागात दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत या दगडफेकींमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले असून दगडफेकीचे कारण अद्यापही समोर आले नाहीत मात्र पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त ठेवला असून अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या परिसरामध्ये दगडांचा मोठा खच पडलेला असून याचे पडसाद आजूबाजूच्या काही गल्ल्यांमध्ये उमटताना दिसत आहेत त्या ठिकाणी हे किरकोळ दगडफेक झाल्याची घटना आत्ताच समोर आली असून पोलिसांनी ताबडतोब धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली