अहमदनगर दि.१५ जानेवारी
अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानकावर आतंकवादी हल्ला झाला या आतंकवादी हल्ल्यामध्ये दोन आतंकवाद्यांनी काही प्रवाशांना बंदुकीच्या धाकावर ओलीस धरल्याची घटना घडली आहे ही घटना कळतच जिल्हा पोलीस दल सतर्क झाले असून शहरातील सर्वच पोलीस ठाण्या मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी माळीवाडा बस स्थानकावर गाव घेतली होती.
सर्वात आधी पोहचले होते एटीएस पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी आणि त्यानंतर हळूहळू सर्वच पोलीस कर्मचारी अधिकारी बस स्थानकावर पोहोचले होते.
मात्र हा डेमो असल्याचं नंतर प्रवाशांना सांगण्यात आल्या नंतर प्रवाशांनी मोकळा श्वास घेतला. मात्र आधीची दहा मिनिटं पोलिसांची धावपळ आणि पोलिसांचे विविध पथक आणि गाड्यांच्या वाजणाऱ्या सायरन मुळे माळीवाडा बस स्थानकावर एकच गोंधळ उडाला होता.