अहमदनगर दि.२० जानेवारी
अहमदनगर शहरातील नव्याने झालेल्या उड्डाण पुलावर पहिला बळी गेला असून उड्डाण पुलावर झालेल्या अपघातामध्ये अहमदनगर शहरातील विधीज्ञ अनिरुद्ध टाक यांचा अपघाती मृत्यू झाला आहे असे नगर शहरातील कामगार न्यायालयात ते प्रॅक्टिस करत होते संध्याकाळी साडे आठ ते नऊ च्या सुमारास अपघात झाल्याची माहिती कळते आहे. अनिरुद्ध टाक हे आपल्या दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक मारून निघून गेल्याने या धडकेमध्ये टाक यांना गंभीर दुखापत झाली होती
दोन तलवारी जप्त
तर दुसऱ्या घटनेमध्ये नगर शहरातील सर्जेपुरा भागातून एका युवकास दोन तलवारीसह अटक करण्यात आली आहे याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांना त्याच्याकडून राहत्या घरातुन दोन तलवारी जप्त केल्या आहेत.
हुक्का पार्लवर छापा
राज चेंबर भागात हुक्का पार्लरवर छापा मुबारक फारुख अल्फाईज ,नईम शेख , सुलतान सय्यद निजामद्दीन यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे २००३ चे सुधारित अधिनिमय २०१८ चे कलम ४ ( अ ) / २१ ( अ ) प्रमाणे पोलिसांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.