Home जिल्हा अहमदनगर की अहिल्यानगर संभ्रमच… राज्यकर्त्यांनी दिलेले गाजर ! आणि दोन्ही समाजाला खुश...

अहमदनगर की अहिल्यानगर संभ्रमच… राज्यकर्त्यांनी दिलेले गाजर ! आणि दोन्ही समाजाला खुश ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांची चाललेली कसरत…

अहमदनगर दिनांक 18 जुलै

निजामशाहीची राजधानी असलेल्या अहमदनगर शहराची स्थापना १४९४ मध्ये मजलक अहमदने केली होती. निजामशाहीनंतर अनेक हुकूमशा या ठिकाणी येऊन गेले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले मात्र अहमदनगर हे नाव अबाधित राहिले होते. इंग्रजांच्या काळातही अहमदनगर शहराला मोठे स्थान होते मोठे लष्करी तळ अहमदनगर शहरात करण्यात आले होते हा इतिहास आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवी नगर करावे अशी मागणी पुढे येऊ लागली. त्या आधी स्वर्गीय हिंदुहृदसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अहमदनगर शहराचे नाव अंबिका नगर करावे अशी मागणी अहमदनगर येथील एका सभेत केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या काही नेत्यांनी नगर शहराचे नाव रामनगर करावे अशीही मागणी केली होती. मात्र अखेर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहिल्यादेवी होळकर नगर असं व्हावं ही इच्छा व्यक्त केली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच त्यांच्या भाषणात घोषणा केली की, सर्वांची इच्छा आहे, त्यामुळे आपण अहमदनगरचं नाव बदलून आहिल्यादेवी होळकर नगर असं केलं जाणार त्या नंतर लोकसभा निवडणुकीच्या अगोदर 13 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगर शहर आणि जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा प्रस्तावास मान्यता देण्यात आली सध्या हे प्रकरण केंद्राच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

मात्र अहमदनगर की अहिल्यानगर याबाबत राजकीय नेत्यांना मात्र दोन्ही डगरीवर हात घेऊन चालावे लागत आहे. त्यांना सध्या मोठी कसरत करावी लागत आहे. अहमदनगर शहरात ऐतिहासिक अशा मोहरम मध्ये “अहमदनगर” लिहिलेले मोठमोठे झेंडे आणि बॅनर पाहायला मिळाले आणि पुन्हा हा प्रश्न समोर आला की अहमदनगर हे अहमदनगर आहे की अहिल्यानगर झाले .

विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे त्यामुळे हिंदूंप्रमाणे मुस्लिम मतही तेवढेच निर्णायक असल्यामुळे आता राजकीय नेत्यांना अहमदनगर म्हणावे की अहिल्यानगर म्हणावे हा प्रश्न पडतो. अनेक राजकीय नेते ज्या समाजाकडे जातात त्या ठिकाणी त्यांच्या सोयीप्रमाणे शहराचे नाव घेतात. लोकसभा निवडणुकीतही हीच गंमत पाहायला मिळाली होती मुस्लिम मोहल्यात गेल्यानंतर तिथे अहमदनगरच म्हटले जात होते तर हिंदू परिसरात गेल्यानंतर तिथे अहिल्यानगर बोलले जात होते.

“अहमदनगर” शहराचे नाव बदलण्यास मुस्लिम समाजाने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे मोहरम मध्ये अनेक ठिकाणी “अहमदनगर”असे मोठे मोठे बोर्ड पाहायला मिळाले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नवनिर्वाचित खासदारांनी सुद्धा अहमदनगर आणि अहिल्यानगर असे दोन्ही नाव आपल्या लेटर पॅडवर छापल्याचा निदर्शनास आले आहे त्यामुळे नेत्यांनाही मोठी कसरत करावी लागत आहे असे दिसून आलंय. आता विधानसभा निवडणूक जवळ आली असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार या नावामुळे अनेक वेळा संभ्रमित होतात ज्या ठिकाणी गेले होते ते अहमदनगर बोलायचे ते अहिल्यानगर याबाबत नेहमीच अडखळताना दिसतात त्यामुळे आता राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारने लवकर मंजूर दिली नाही तर नगर शहर किंवा जिल्हा अहमदनगर राहणार की अहिल्यानगर होणार हे भविष्य ठरवेल मात्र येणाऱ्या विधानसभेत इच्छुक उमेदवारांना या नावाबाबत चांगलीच मोठी कसरत करावी लागणार आहे हिंदू आणि मुस्लिम समाजाला खुश ठेवण्यासाठी अहिल्यानगर आणि अहमदनगर हे दोन्ही नाव आता त्यांना तोंड पाठ करून घ्यावे लागतील ही नावे नेमकं कुठे घ्यायची याचेही लक्ष ठेवावे लागेल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version