अहमदनगर दि. १३ डिसेंबर
अहमदनगर शहरातील एका सहकारी बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या एका चार्टर्ड अकाउंटंटला पोलिसांनी अहमदनगर जिल्हा बाहेर ताब्यात घेतले असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समजली आहे.आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कामगिरी केली असल्याची माहिती समोर येत असून अहमदनगर शहरातील प्रतिष्ठित असलेल्या या अकाउंटला ताब्यात घेतल्यामुळे हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
नगर शहरात नावाजलेली आणि प्रतिष्ठित असलेल्या सहकारी बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेकडून झाली असून सध्यातरी पोलिसांनी या अकाउंटला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.