अहिल्यानगर दिनांक 4 नोव्हेंबर
अहमदनगर शहर मतदारसंघात अर्ज माघारी नंतर आता चौदा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले असून महाविकास आघाडी, महायुतीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, सैनिक समाज पार्टी आणि अपक्ष अशा 14 जणांचा अर्ज कायम राहिल्याने ही निवडणूक आता बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत.
अर्ज माघारीनंतर आता उमेदवारांना चिन्ह वाटप आणि अनुक्रमांक नंबर वाटप करण्यात आले असून प्रथम क्रमांकावर अभिषेक कळमकर तर चौथ्या क्रमांकावर संग्राम जगताप यांना स्थान मिळाले आहे. संग्राम जगताप यांचे चिन्ह घड्याळ आहे तर अभिषेक कळमकर यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे.
अपक्ष उमेदवारांना मिळेल चिन्ह आणि अनुक्रमांक
७ उत्कर्ष राजेंद्र गिते – सितार
८ कळमकर गणेश बबन – बासरी
९ काळे किरण नामदेव – स्टेथोस्कोप
१० गाडे शशिकांत माधवराव (सर)- लॅपटॉप
११ बारसे प्रतिक अरविंद (पप्पू भाऊ) – ट्रम्पेट
१२ मंगल विलास भुजबळ – शिट्टी
१३ राठोड सचिन बबनराव – नरसाळे
१४ सुनिल सुरेश फुलसौंदर – रेझर