Home शहर मरणा नंतरही नागरकरांच्या समस्या पाठ सोडेनात खड्डे आणि धुळीच्या मार्गावरून आमरधाम मध्ये...

मरणा नंतरही नागरकरांच्या समस्या पाठ सोडेनात खड्डे आणि धुळीच्या मार्गावरून आमरधाम मध्ये गेल्यावर अंधारात अंत्यसंस्काराची वेळ

अहमदनगर दि.२५ मे
अहमदनगर शहरातील सर्वच मार्ग खडतर झाले आहेत नगर शहरातील प्रत्येक जिवंत माणूस रोज या खडतर मार्गावरूनच प्रवास करतोय या खडतर मार्गामुळे अनेकांना पाठीचे मानेचे धुळी मुळे श्वासनाचे आजार झाले आहेत.मात्र हे खडतर मार्ग सुकर होण्या बाबत काही मनपा प्रशासनाकडून काहीही कारवाई होताना दिसत नाही. मधल्या काळात शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी याबाबत बांधकाम विभागात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला होता आणि निवेदन दिले होते मात्र त्यांच्या निवेदनाला बांधकाम खात्याने केराची टोपली दाखवली असल्याचे समोर आले आहे.

कारण आता पावसाळा तोंडावर आला असला तरी नगर शहरातील रस्ते जैसे थे आहेत अनेक रस्ते खंदण्यात आल्याने रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमधून उडणारी धूळ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. मात्र ही मनपा प्रशासन आणि बांधकाम विभागाला याचंच काही घेणंदेणं नसल्यासारखं दोन्ही कार्यालयाची कृती दिसून येत आहे.

या खडतर रस्त्यावरून जिवंत माणूस दररोज प्रवास करतो मात्र आता माणसाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याचा प्रवास सुखकर होत नाही या धूळ आणि खड्ड्यांच्या रस्त्यावरून कशीबशी वाट काढून त्याचा मृतदेह आमरधाम पर्यंत शेवटचा प्रवास करतो. मात्र तिथेही त्याला समस्यांचा सामना करावाच लागतो या ठिकाणी लाईट गेल्याने अंधारात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नगरकरांना येत आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही समस्या नगरकरांची पाठ सोडत नाही हे यावरून सिद्ध होते.महानगरपालिकेने आणि बांधकाम विभागाने तसेच अमरधाम मधील सोयी सुविधांबाबत मनपा प्रशासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. जिवंतपणी नाही तर किमान मेल्यानंतर तरी सुखाने शेवटचा प्रवास नागरकरांना करू द्या अशी प्रतिक्रिया मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version