Homeविशेष1951 ते 2024 पर्यंत नगर शहराच्या विधानसभा निवडणुकीचा आढावा... 129 अहमदनगर...

1951 ते 2024 पर्यंत नगर शहराच्या विधानसभा निवडणुकीचा आढावा… 129 अहमदनगर मतदारसंघ ते 225 नगर शहर मतदारसंघ कोण कोण उमेदवार ! नगरकरांनी कोणाला दिली होती जास्त पसंती…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 3 नोव्हेंबर

1951 साली 129 अहमदनगर मतदारसंघात सात उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते या निवडणुकीत प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पार्टी ,कामगार किसन पक्ष, अखिल भारतीय हिंदू महासभा आणि फॉरवर्ड ब्लॉक मार्केट या पक्षांचा समावेश होता 1951 साली विठ्ठल कुटे हे 16,778 मतांनी आमदार झाले होते तर त्या खालोखाल असलेल्या समाजवादी पार्टीच्या काशिनाथ करंदीकर यांना 5,589 मते मिळाली होती सर्वात कमी मते अपक्ष असलेल्या पारखे हरिभाऊ यांना 193 मते मिळाली होती.

1957 साली अहमदनगर मतदारसंघाचे नाव 223 अहमदनगर दक्षिण असे झाले यावेळी एकास एक दोनच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते त्र्यंबक भारदे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून तर कमला रानडे या अपक्ष म्हणून उभ्या होत्या 18,674 मतं भारदे यांना पडली होती तर रानडे यांना 14,398 मते मिळाली होती.

1962 साली पुन्हा एकदा काँग्रेसकडून त्र्यंबक शिवराम भारदे हे निवडून आले होते त्यावेळी त्यांना 17,727 मत पडली होती तर नौरोजी सट्टा या अपक्ष उमेदवार व त्यांच्यासमोर उभे होते तर रमय्या दगडू अडेप हे जनसंघाच्या वतीने उमेदवारीच्या रिंगणात होते.

1967 साली 215 अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून एस. व्ही.मिसाळ काँग्रेस पक्षा कडून निवडून आले तर पि.के. भापकर, एन.ए, बार्शीकर आणि एन.जी. करमकर हे त्यांच्या विरुद्ध होते 16,485 इतके मत मिसाळ यांना मिळाली होती. या यावेळी चारच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

1972 साली नारायणदास बार्शीकर हे अपक्ष म्हणून अहमदनगर दक्षिण मतदार संघातून निवडून आले होते तर कालाबाई रानडे यांचा त्यांनी पराभव केला होता रानडे या काँग्रेसच्या वतीने उभे होत्या तर 1972 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गट या निवडणुकीत उतरला होता.

1978 साली 229 अहमदनगर दक्षिण मतदार संघातून कुमार सप्तर्षी जनता पक्षाच्या वतीने निवडून आले होते 19 हजार 39 मते त्यांना मिळाली होती तर पोळ बुद्धनाथ हे काँग्रेसचे उमेदवार होते.

1980 साली 229 अहमदनगर दक्षिण मतदार संघातून आसिर एस. एम. आय. हे काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून आले होते त्यांना ३०१२२ मत मिळाली होती तर नाथ पाऊलबुधे यांना 27 हजार 800 मते मिळाली होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युनायटेड च्या वतीने ते उभे होते मुकुंद घैसास जनता पक्ष वतीने उभे होते 7,971 इतके मते त्यांना मिळाली होती.

1985 साली अहमदनगर दक्षिण मतदार संघातून दादासाहेब कळमकर हे भारतीय काँग्रेस समाजवादी पक्षाच्या वतीने निवडून आले होते. या निवडणुकीत नऊ उमेदवार उभे होते दादासाहेब कळमकर यांना 49 हजार 929 इतकी मते मिळाली होती.

1990 साली 229 अहमदनगर दक्षिण मतदार संघात अनिल रामकिसन राठोड हे शिवसेना पक्षाच्या वतीने 42 हजार 419 मते घेऊन निवडून आले होते. शिवसेनेचा पहिलाच आमदार म्हणून अहमदनगर शहरात अनिल राठोड यांची एन्ट्री होती तर यावेळी दादाभाऊ कळमकर यांना पराभव स्वीकाराला लागला होता या निवडणुकीत 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

1995 साली 229 अहमदनगर दक्षिण मतदार संघात जवळपास 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तर या वेळेस पुन्हा अनिल राठोड हे शिवसेनेच्या वतीने निवडून आले होते 61 हजार 289 मते त्यांना मिळाली होती तर पुन्हा एकदा दादाभाऊ कळमकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता 35 हजार 461 मते कळमकर यांना मिळाली होती तर याच निवडणुकीत शंकराव घुले, माधवराव लामखडे, मल्लेशाम यमुल ,अशा अनेक दिग्गज लोकांनी निवडणुकीत उमेदवारी केली होती.

1999 साली 229 अहमदनगर दक्षिण मतदार संघात अनिल राठोड विरुद्ध दादाभाऊ कळमकर अशी लढत झाली यावेळी अनिल राठोड यांनी 38 हजार 925 मिळवली होती तर दादाभाऊ कळमकर यांना 22 हजार 26 मत मिळाली होती तर ब्रीजलाल सारडा या निवडणुकीत उभे होते त्यांना 21,837 मते मिळाली होती त्याचवेळी अरुण जगताप हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असताना त्यांना 14,744 मते मिळाली होती.

2004 साली 229 अहमदनगर दक्षिण मतदार संघात पुन्हा एकदा अनिल राठोड विरुद्ध दादाभाऊ कळमकर अशी लढत झाली होती यावेळी राठोड यांना 78 हजार 192 तर कळमकर यांना 52 हजार 742 मते पडले होते तर या निवडणुकीत फक्त पाच उमेदवार उभे होते.

2009 साली 225 अहमदनगर मतदार संघात अनिल राठोड हे पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि 65 हजार 271 मते घेऊन ते निवडून आले होते तर यावेळी सुवालाल गुंदेचा हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत होते 25 हजार 726 इतकी मते त्यांना मिळाली होती तर अभय आगरकर यांना 17781 नजीर शेख यांना आठ हजार आणि यावेळेस महाराष्ट्र निर्माण सेनेने या निवडणुकीत एन्ट्री केली होती यावेळी सचिन डफळ यांना 7441 मते मिळाली होती तर अशोक सोनवणे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून उमेदवारी मिळेल होती त्यांना 4155 मते मिळाली होती या निवडणुकीत 16 उमेदवार उभे होते.

2014 साली 225 अहमदनगर शहर मतदारसंघात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशा चारही प्रमुख पक्षात लढत झाली होती. यामध्ये संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवत होते त्यांना 49 हजार 378 मते मिळून ते विजयी झाले होते तर शिवसेनेचे अनिल राठोड यांना 46,061 मते मिळाली होती . अभय आगरकर यांना 39 हजार 913 मते मिळाली होती. सत्यजित तांबे यांना 27 हजार 76 मते मिळाली होती तर प्रथमच नोटा ला 1614 मते मिळाली होती.

2019 आली 225 अहमदनगर शहर मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप विरुद्ध शिवसेनेचे अनिल राठोड यांच्या समोरासमोर लढत झाली यावेळी संग्राम जगताप यांना 81,217 मध्ये मिळाली तर अनिल राठोड यांना 70,078 मते मिळाली या निवडणुकीत एम आय एम आय एम पक्षाने एन्ट्री घेतली होती असिफ सुलतान यांना यावेळी 6869 मते मिळाली होती याच वेळी वंचित बहुजन आघाडीचे किरण काळे यांना 2,881 मते मिळाली होती.

1951 साली अहमदनगर शहर मतदारसंघात 60,982 इतके मतदार होते तर 2019 मध्ये दोन लाख 89 हजार 629 इतके मतदार होते आता ही संख्या तीन लाखाच्या वर गेली आहे.

225 नगर शहर मतदार संघ
2024 साली आता निवडणूक होत असून या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या वतीने अभिषेक कळमकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर महायुतीच्या वतीने विद्यमान आमदार संग्राम जगताप निवडणुकीच्या रिंगणात उभे असून अहमदनगर शहर मतदारसंघ हा नेहमीच वेगवेगळ्या उमेदवारांना संधी देत गेला आहे फक्त शिवसेनेचे स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांना सलग पाच वेळा अहमदनगर शहर मतदार संघाने आमदारकीची संधी दिली होती त्यामुळे अहमदनगर शहर मतदारसंघ हा आता अहिल्यानगर मतदारसंघ झाला असून आता 2024 साला मध्ये कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संग्राम जगताप यांना दोन वेळा नगरवासीयांनी संधी दिली आहे तिसऱ्या वेळेस ते उमेदवारीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळे आता ही निवडणुकी दोन तरुणांमध्ये अत्यंत चुरशीची होत असल्यामुळे सर्वांचे लक्ष अहमदनगर शहर मतदारसंघाकडे लागून आहे.

ही संपूर्ण माहिती जिल्हा माहिती अधिकारी यांच्या मार्फत अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली असून त्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर किरण मेघे, अमोल महाजन, आकाश दहाडदे, प्रशांत गोसावी, सुरेश पाटील, धनंजय जगताप, संतोष गुजर, सुरज लचके या सर्वांच्या सहाय्याने ही माहिती मतदारांपर्यंत पोहोचली गेली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular