Homeराजकारणमहाविकास आघाडीचा उमेदवार बदलणार या विरोधकांनी पेरलेल्या अफवाच अभिषेक कळमकर..

महाविकास आघाडीचा उमेदवार बदलणार या विरोधकांनी पेरलेल्या अफवाच अभिषेक कळमकर..

advertisement

अहिल्यानगर दि. 3 नोहेंबर

विधानसभा निवडणुक आता मधल्या टप्प्याकडे जात असताना नगर शहर मतदार संघात अद्यापही विविध बातम्यांचे पेव फुटले आहे. अर्ज भरेपर्यंत अनेक अफवा पसरल्या जात होत्या. महाविकास आघाडीकडून नेमका अर्ज कोण भरणार कोणाच्या गळ्यात उमेदवारी माळ पडणार याबाबत अनेक अफवा आणि चर्चा होत होत्या अखेर महाविकास आघाडी कडून अभिषेक कळमकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. आता अर्ज माघारी घेण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिले असून आता पुन्हा नगर शहरात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. शेवटच्या क्षणाला महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊन दुसऱ्या एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चा विरोधक पसरवत असून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यामुळे अशा अफवा पसरवल्या जात असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनी दिली आहे.

मी दहा वर्षे झाले राजकारणात आहे अनेक वेळा अशा अफवा जनेतेत पसवरल्या गेल्या मी सरेंडर होईल कोणाबरोबर तरी सेटलमेंट करेल मात्र अभिषेक कळमकर कधीही सरेंडर होणारा व्यक्ती नाही हे संपूर्ण शहराला माहित आहे. निवडणूक लढवण्याची संधी शरद पवार यांनी मला दिलेली आहे त्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. जनतेने विश्वास टाकलेला आहे त्यामुळे कोणत्याही अफवा या निवडणुकीत काम करू शकणार नाही आणि जनतेच्या बाळावर मी निश्चितच निवडून येईल असा विश्वास अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेऊन अपक्ष उमेदवार सुवर्णा कोतकर यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा सध्या शहरात जोरात सुरू आहे मात्र या सर्व विरोधकांनी पसरवलेल्या अफवा असल्याचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक कळमकर यांनी स्पष्ट केल आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular