HomeUncategorizedखंडू उर्फ अजय बारस्कर हा सरकारचा हस्तक..बारस्कर कधीच आंदोलनात सहभागी नव्हता .

खंडू उर्फ अजय बारस्कर हा सरकारचा हस्तक..बारस्कर कधीच आंदोलनात सहभागी नव्हता .

advertisement

अहमदनगर
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या महानगरपाल गेल्या काही महिन्यांपासून मनोज रंगे पाटील लढा देत आहेत आता सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले असले तरी सरकारने दिलेले आरक्षण आम्हाला मान्य नसल्याचं गुणोत्तरंगे पाटील यांनी सांगितले असून त्यांनी आपला लढा सुरूच ठेवला आहे मात्र आता मराठा आरक्षण संघर्षामध्ये फूट पाडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे नगरच्या अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

अजय महाराज बारस्कर हे मूळचे अहमदनगर शहरातील ते राजकीय आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पुढे महाराज झालेले आहेत त्यांनी या आधी. महानगरपालिकेच्या निवडणुक लढवली आहे. मराठा समाजाचे जेव्हापासून आंदोलन सुरू झाले तेव्हापासूनच त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने दोन महिन्यापूर्वीच अहमदनगरच्या मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अजय महाराज बारस्कर यांना बाहेर काढले होत अजय महाराज बारस्कर यांच्यावर खंडणीचे गंभीर आरोपही झालेले आहेत अहमदनगर मधील मराठा समाजाच्या संघटने पत्रकार परिषद घेऊन अजय महाराज बारस्कर यांचे सर्व आरोप फेटाळून लावलेला असून त्यांनी आंदोलन म्हणण्यासाठी केलेल्या गोष्टींची जंत्रीच वाचून दाखवली.

अहमदनगर मध्ये आज मराठा क्रांती मोर्चा एडवोकेट गजेंद्र दांगट, निलेश सुंबे,विशाल घोलप यांनी पत्रकार परिषद घेऊन अजय महाराज बारस्कर यांच्या बाबत खुलासा केला. खंड्या उर्फ अजय बारस्कर हा सुरवातीला खाकी कपडे घालून गाड्या लुटण्याचे काम करत होता असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.तसेच महापालिकेच्या निवडणुकीत पैसे घेतल्याने त्याला काही काळ पळून जावे लागले होते तसेच तसेच एका लहान मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे आणि भिशी चालवण्याचे काम करत असताना भिशीचे पैसे घेऊन पळून गेला होता त्यावेळी त्याला नागरिकांनी धरून आणल्याचा आरोपही करण्यात आला. कोणतेही उत्पन्नाचे साधन नसताना जमिनी घेतल्या त्याचा पैसा कसा आला याची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

खंडू उर्फ अजय हा सुरवाती पासून आंदोलनात फूट पडावी म्हणून प्रयत्न करत होता त्यामुळे त्याला दोन महिन्या पूर्वी हाकलून दिल्याचे पत्रकार परिषदेत संगतीले.

मागील आठवड्यात खंडू उर्फ अजय बारस्कर हा कोणत्या तरी मोठ्या नेत्यांच्या बरोबर हवाई सफर करून आला आणि त्या नंतर त्याने बोलायला सुरुवात केली मराठा आंदोलन थांबवण्यात सरकारला अपयश आल्याने फूट पाडून आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप या वेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला.

खंडू उर्फ अजय बारस्कर याच्यवर कारवाई करावी म्हणून सकल मराठा समजाच्य वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आंदोलन सुरूच राहणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular