अहमदनगर दि.२१ फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील उच्चभृ वस्तीत असलेल्या एका हुक्का पार्लरवर शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने कारवाई करत फैजान कुतुबुद्दीन जमादार याच्यावर कारवाई केली आहे.
फैजान कुतुबुद्दीन जमादार हा सुरभी हॉस्पिटल जवळ असलेल्या एका पत्र्याचे शेडमध्ये Smoke Chill
नावाचा हुक्का बार चालवित होता. शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने या हुक्का पार्लरवर छापा टाकून काचेचे पॉट, ०३ चिलीम, ०३ हुक्का पाईप प्लॉस्टीक डबे त्यामध्ये तंबाखुजन्य
पदार्थ असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई शहर पोलीस उपाधीक्षक पथकातील पोसई/दत्तात्रय शिंदे, पोहेकॉ सुयोग संजय सुपेकर पोहेकॉ/राजु जाधव, पोना हेमंत खंडागळे,पोकॉ सागर राजेंद्र द्वारके यांनी केली