अहमदनगर दि.२ जुलै
महाराष्ट्र मध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्ताधारी फडवणीस शिंदे गटाला जाऊन मिळाला असून या घडामोडीत महाराष्ट्राला पुन्हा एक नवीन उपमुख्यमंत्री मिळाला आहे. अचानक झालेल्या या सर्व राजकीय घडामोडी मुळे अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत तर काही ठिकाणी या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप अजित पवार गटा सोबत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल फटाकडे फोडून पेढे वाटत जल्लोष केला आहे. उपमुख्यमंत्री पदी पुन्हा एकदा अजित पवार विराजमान झाल्यामुळे राज्यातील तसेच अहमदनगर शहरातील विकास कामे पुन्हा एकदा जलद गतीने सुरू होतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला आहे.
या वेळी सुरेशभाऊ बनसोडे,नगरसेवक, अजिंक्य बोरकर,सुमेध गायकवाड, जिल्हाध्यक्ष कवाडेगट
सोमा शिंदे, अंकुश मोहिते समीर भिंगारदिवे, पप्पु पाटील,वैभव साळुंके, सर्जिन कसवे, राहुल सोनटक्के, अक्षय बोडे,तेजस गायकवाड उपस्थित होते.