Home शहर आंबेडकरी आणि मातंग समाजाच्या विरोधात गलिच्छ भाषेत संभाषण ती ऑडिओ क्लिप...

आंबेडकरी आणि मातंग समाजाच्या विरोधात गलिच्छ भाषेत संभाषण ती ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होतेय… जिल्हा बंदी उठवून आलेल्या त्या इसमाकडून पुन्हा नगर शहरात दादागिरी

अ.नगर दिनांक 16 ऑक्टोबर
सोशल मीडियावर सध्या एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत असून या क्लिप क्लिप मध्ये आंबेडकरी समाजाच्या आणि मातंग समाजाच्या विरोधात गलिच्छ शब्दात भाष्य केले असल्याचे ऐकू येत आहे. ज्यामुळे आंबेडकरी समाजातील जनतेमध्ये संतापाची तीव्र भावना उसळली असून या क्लिपमधील इसमाविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी आता आंबेडकरी जनतेमधून समोर येत आहे.

या क्लिपमध्ये सोशल मीडियावरील एका ग्रुप मधून मला रिमुव्ह कर असा दम समोरचा व्यक्ती देत असून दम देत असताना आंबेडकरी आणि मातंग समाजाच्या विरोधात जातीयवादी शब्द वापरण्यात आले आहेत ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या क्लिपमध्ये ज्या इसमाचा आवाज आहे तो व्यक्ती नुकताच कोर्टाच्या आदेशाने जिल्हा बंदी उठवून नगर शहरात आला आहे. काही दिवसांपूर्वीच एका हॉटेल मॅनेजर मला मारहाण केल्याचा गुन्हाही त्याच्या विरोधात दाखल करण्यात आला होता. एका खुनाच्या आरोपात सध्या जामीन घेऊन बाहेर असलेला हा इसम पुन्हा एकदा नगर शहरात येऊन दादागिरीची भाषा करत असल्याचं या क्लिप मधून समोर आले आहे.

नगर शहरातून दादागिरी न करता कायदा सुव्यवस्था राखण्याची न्यायालयात हमी दिली असताना पुन्हा एकदा दादागिरी त्या इसमांकडून दादागिरीची भाषा होत असल्यामुळे या इसमाविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करून ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version