Homeशहरदहा दिवसांचे काम अवघ्या चोवीस तासात काम पूर्ण.....गुलमोहर रस्त्यावर पारिजात चौकातील ड्रेनेज...

दहा दिवसांचे काम अवघ्या चोवीस तासात काम पूर्ण…..गुलमोहर रस्त्यावर पारिजात चौकातील ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण..

advertisement

अहिल्यानगर दिनांक १० जून –

आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यातून राज्य शासनाने या रस्त्याच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून ड्रेनेज लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. सावेडी टेलिफोन ऑफिस ते पारिजात चौक ते एकविरा चौक ते तपोवन रस्ता या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे . तत्पूर्वी या मार्गावर अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन टाकण्यात येत होती . गुलमोहर रस्त्यावर पारिजात चौक येथे या कामाला नऊ जून रोजी सुरुवात करण्यात आली होती. ९ जून ते १८ जून या कालावधीत हे काम होणार होते. त्यामुळे दहा दिवस या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली होती. मात्र ही काम अवघ्या 24 तासात पूर्ण करून महानगरपालिकेने एक वेगळाच विक्रम केला आहे.

या ड्रेनेज लाईनमुळे पारिजात चौक परिसरातील वसाहतींमध्ये साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.दहा दिवस हे काम सुरू राहणार असल्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार होता मात्र महानगरपालिकेने युद्ध पातळीवर काम करून. सात पोकलेन, एक ग्रेडर, एक रोलर, तीन डंपरच्या साह्याने रात्रीतून हे काम पूर्ण करून नागरिकांना पारिजातक चौकातून ये जा करण्यासाठी रस्ता खुला करण्यात आला आहे.

गुलमोहर रॉड येथील पारिजात चौकातील वाहतूक १० दिवसासाठी बंद करण्यात आली आहे ते काम ४८ तासात पूर्ण करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली

पारिजातक चौकाचे काम विक्रमी वेळात करून दिल्याबद्दल या परिसरातील नागरिकांनी पारिजात चौक येथे आमदार संग्राम जगताप, मनपा आयुक्त यशवंत डांगे, नगरसेवक अजिंक्य बोरकर, या रस्त्याचे काम करणारे दत्त दिगंबर कंस्ट्रक्शनचे काका थोरात आणि त्यांच्या कामगारांचे आभार मानले.यावेळी शिरीष जानवे, प्रदीप घोडके, अभय खभिया, लक्ष्मीकांत पठारे, विशाल साबळे, अशोक दहिफळे, आकाश सोनवणे, निलेश आव्हाड, प्रसाद पाठक, तसेच नरहरी नगर भागातील होमकर साहेब, चिंतामणी साहेब,सचिन कसबे , दीपेश दाणे, दिपक दळवी, विशाल पालावे, आदी गुलमोहर रोड भागातील सर्व नागरिक उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular