नगर दिनांक 10 जून
नगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील नऊ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात सहा पोलीस निरीक्षक, ३ सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा अंतर्गत बदलांची ही पहिलीच प्रक्रिया राबवली असून. त्याआधी जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली होती.
नुकत्याच झालेल्या जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष रामचंद्र मुटकुळे यांची शेवगाव येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सोपान पाराजी शिरसाट यांची नियंत्रण कक्षातून कर्जत येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दशरथ निंबा चौधरी यांची श्रीरामपूर येथून जामखेड येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विलास सहादु पुजारी यांची घारगाव येथून पाथर्डी येथे नियुक्ती करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक रामकृष्ण महादु कुंभार नियंत्रण कक्ष येथून कोपरगाव येथे नियुक्ती करण्यात आली आहे.अरुण काशिनाथ धनवडे नियंत्रण कक्ष येथून श्रीरामपूर येथे नियुक्त करण्यात आले आहे.हेमंत शिवाजी थोरात स्था.गु.शा. येथून घारगांव येथे नियुक्ती करण्यात आली आहे. विजय किसन झंजाड खर्डा येथून मिरजगाव येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
उज्वलसिह नवलसिंह राजपुत यांची तोफखाना येथून खर्डा येथे बदली करण्यात आले आहे. तर जामखेड येथील पोलीस निरीक्षक महेश विष्णु पाटील यांची जामखेड ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.