Home शहर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय घोषित मतदार याद्या बेकायदेशीर; पालकमंत्री-मावळलेले खासदार...

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय घोषित मतदार याद्या बेकायदेशीर; पालकमंत्री-मावळलेले खासदार विखे पिता-पुत्राच्या निर्देशांवर मतदार याद्यांधी सोयीस्कर तोडफोड : शिवसेना उबाठाचे गिरीश जाधव यांचा गंभीर आरोप

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर महानगरपालिकेची प्रभागरचनानुसार जाहीर केलेली मतदार याद्या पूर्णपणे बेकायदेशीर, चुकीच्या व राजकीय दबावाला बळी पडून करण्यात आल्या आहेत. ही बाब लोकशाहीच्या नीतिमुल्यांची पायमल्ली करणारी आहे. भाजपाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचा सुपुत्र मावळलेले खासदार सुजय विखे पाटील यांच्या निर्देशांनुसार ही प्रभाग रचनेनुसार मतदार याद्यांधी तोड फोड करण्यात आली असून निवडणूक आयोगाने स्वतःचे नियमच पायदळी तुडवले आहेत,” असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख गिरीश तुकाराम जाधव यांनी केला आहे.

Oplus_131072

राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रक ठरवूनही नगर मनपाचेआरक्षण प्रकटीकरण मुद्दाम रखडवण्यात आले होते. सहा नोव्हेंबर ही नियोजित तारीख असतानादेखील, अचानक रविवारी संध्याकाळी – जे दिवशी महानगरपालिका व शासन कार्यालये पूर्ण बंद असतात – कार्यालय उघडून प्रभागरचना जाहीर करण्यात आली. त्यात आरक्षणाचा उल्लेख नव्हता जो कि कायद्याप्रमाणे व्हायला हवा होता. त्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या. या सर्वाना केराची टोपली दाखवत आरक्षण जाहीर करण्यात आले. नंतर गुरुवारी अंतिम प्रभाग रचनेनुसार मतदार यादी घोषित करण्यात आली. ज्यात अनेक मोठे जावई शोध लावण्यात आले आहेत. अनेकांची नावे मतदार यादीतून आपल्या मूळ प्रभागातून गायब आहेत. जी नावे भलत्याच ठिकाणी आलेली आहेत. विद्यमान महाविकास आघाडीचे नगरसेवक व विरोधी पक्षाच्या उमेदवारांना प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणारी ही यादी आहे.
“ही कृतीच प्रशासनावर राजकीय दबाव किती आहे हे दर्शवते,” असे जाधव म्हणाले.

पूर्वी निश्चित केलेल्या प्रभाग सीमांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून प्रभाग ९, १५ व १६ हे भाजप व शिंदे गटाच्या माजी महापौर–नगरसेवकांना अनुकूल होतील अशाप्रकारे रचना केली गेली.
अनेक भागांचा संबंधित नव्या प्रभागाशी भौगोलिक संबंध नसताना, नदीकाठ–महामार्ग–राजमार्ग–वसाहती तोडून हे भाग वेगवेगळ्या प्रभागात जोडण्यात आले.
“राज्य महामार्ग, रेल्वे रेषा, नदीपात्र ओलांडू नयेः या मूलभूत नियमांनाही बगल देण्यात आली,” असे जाधव म्हणाले.

मतदारयादीत मोठ्या प्रमाणात दुबार व तीबार नावे असून ती वगळण्यात आलेली नाहीत. अनेक ठिकाणी बोगस नावे या या यादीत घुसडविण्यात आली आहेत.
“हे तसेच ठेवून भाजपला दोन-दोन ठिकाणी मतदान करण्याची संधी देण्यात आली आहे. मतांचा काळाबाजार करून इच्छित नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न आत्यामुळे “ही प्रभागरचना आम्हाला मान्य नाही. आम्ही न्यायालयात जाऊ आणि रस्त्यावर लढू. लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आम्ही कधीही सहन करणार नाही,” असा इशारा जाधव यांनी दिला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version