नगर – अहिल्यानगर शहराचे आमदार अत्यंत तळमळीने व सतत पाठपुरावा करून नगर शहराच्या विकासासाठी कोट्यवधींची विकास निधी मंजूर करून आणत आहेत. मात्र महानगरपालिकेच्या प्रशासनला व अधिकाऱ्यांना या विकासकामांशी काहीही देणेघेणे नाहीये. आ. संग्राम जगताप यांनी सामान्य प्रवासी नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाश्यांच्या सोयीसाठी माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी तब्बल साडे सोळा कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडे अथक परिश्रमाने पाठपुरावा करून मंजूर करून आणला आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून नूतनीकारणाचे काम मनपाच्या उदानसीते मुळे रखडले आहे. केवळ नगररचना विभागाच्या एका एनओसी साठी माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणास दिरंगाई होत आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवासी नागरिकांना होत असून दररोज त्यांना बसची वाट बघत उन्हातान्हात उभी राहावे लागत आहे. याला महानगरपालिकेचा ढिसाळ व निष्क्रिय कारभार जबाबदार आहे. नगररचना विभागातून दोन दोन महिने फाईल पुढे सरकत नाही; साधी एनओसी अधिकाऱ्यांना देता येत नाही. हा अत्यंत निंदनीय व अक्षम्य प्रकार आहे, असा संताप व्यक्त करत माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी जर मनपाने दोन दिवसात माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामास एनओसी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
यावेळी काढलेल्या पत्रकात गणेश भोसले म्हणाले आहेत की, माळीवाडा बसस्थानकाच्या इमारतीच्या नूतनीकरण निधी मंजूर झाल्याने बस्साथाकाची जुनी इमारत पाडण्यात आली असून नव्या इमारतीच्या कामास त्वरित सुरवात करण्यत येणार होती. मात्र महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या उदानसीते मुळे व नगररचना विभागाच्या बोगस आणि निष्क्रिय कारभारामुळे माळीवाडा बसस्थानकाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे जनतेच्या विकासाच्या अपेक्षांवर आणि आमदारांच्या अथक मेहनतीवर असे पाणी फिरवणे योग्य आहे का? महानगरपालिकेची यंत्रणा जर अशीच चालणार असेल, तर मग विकासाच्या नावाखाली जनतेला आम्ही काय उत्तर द्यायचं ? मनापाच्या नगररचना विभागातील बोगस कारभार योग्य आहे का? काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे कितपत योग्य आहे? असे सवाल गणेश भोसले यांनी मनपा आयुक्तांना विचारले आहेत.
माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामास मनपाने दो दिवसात एनओसी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा माजी महापौरांनी गणेश भोसले यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.