Homeशहरअहमदनगर महानगरपालिकेवर अखेर आजपासूनच प्रशासकीय राज सुरुवात.. 31 डिसेंबरची वाटच पाहावी लागली...

अहमदनगर महानगरपालिकेवर अखेर आजपासूनच प्रशासकीय राज सुरुवात.. 31 डिसेंबरची वाटच पाहावी लागली नाही..

advertisement

अहमदनगर दिनांक २८ डिसेंबर
महापालिका सभागृहातून ६८ नगरसेवकांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपणार होता. मात्र 28 तारखेच्या मध्यरात्रीत नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे तसे शासनाचे आदेशही निघाले असून या बातमीला महानगरपालिका आयुक्तांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आज होणारी स्टॅंडिंग कमिटीची बैठक आणि 29 तारखेला होणारी महानगरपालिकेची शेवटची सर्वसाधारण महासभा आता होणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

29 डिसेंबर रोजी महानगरपालिकेची शेवटची महासभा ठेवण्यात आली होती या सभेत अनेक मोठमोठे विषय मंजूर करण्यासाठी विषय पत्रिकेवर मांडण्यात आले होते मात्र 28 तारखेला रात्री उशिरा रात्री नगरसेवकांचा कार्यकाळ संपला असल्याची खात्रीशीर माहिती येत असून त्यामुळे आता 29 तारखेला होणारी महासभा होणार नाही त्यामुळे आता आजपासूनच महानगरपालिकेवर प्रशासकीय राज सुरुवात होणार आहे.

मात्र महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती झाली याबाबत अद्यापही नगर विकास खात्याकडून माहिती प्राप्त झालेली नाही अहमदनगर महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त किंवा जिल्हाधिकारी अथवा जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती प्रशासक म्हणून होऊ शकते मात्र याबाबत अद्यापही कोणतेही पत्र महानगरपालिकेला प्राप्त झालेले नाही.

प्रभागातील प्रश्न सोडविण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने अनेक नगरसेवकांची धांदल उडाली होती. अनेक नगरसेवक गेल्या दोन आठवड्यापासून महानगरपालिकेत ठाण मांडून आहेत. पाच वर्षात जी विकासकामे करता आली नाहीत, ती पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न नगरसेवक करताना दिसत होती.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular