Homeशहरअहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने एमआयडीसीतील कामगारांसाठी सिटी बस सेवेचा शुभारंभ संपन्न केंद्र...

अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने एमआयडीसीतील कामगारांसाठी सिटी बस सेवेचा शुभारंभ संपन्न केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच शहरांमध्ये 20 इलेक्ट्रिक बस धावणार – आ.संग्राम जगताप

advertisement

अहमदनगर दि.२८ सप्टेंबर – कामगार वर्ग हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे नगर एमआयडीसी मधील कामगारांचा सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उद्योजकांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती तसेच एमआयडीसी मधील कामगारांसाठी सिटी बस सेवा सुरू व्हावी यासाठी सुमित लोढा यांनी पाठपुरावा केला त्यानंतर तातडीने महापालिकेच्या माध्यमातून सिटी बस सेवा सुरू केली आहे. लवकरच माळीवाडा येथे भव्य दिव्य बस स्थानक उभे राहणार असून त्याचे काम सुरू होणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच 20 इलेक्ट्रिक बस शहरांमध्ये धावणार असून केडगाव येथे बस डेपोचे काम सुरू होणार आहे इतिहासाचा वारसा जोपासत आपण शहरांमध्ये नवनवीन प्रगतीच्या संकल्पना राबवत आहोत मागील २५ वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरत असताना प्राथमिक सुख सुविधा पासून काम करावे लागले आहे सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपले शहर म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे. या पुढील काळात एमआयडीसीमध्ये मोठ मोठे उद्योग आणण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे बस सेवेच्या माध्यमातून महिला भगिनीचा सुरक्षित प्रवास होणार आहे शहरातील उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करत युवकांना रोजगार देण्याचे काम केले आहे चांगल्या कामासाठी आवाज द्या तुमच्या हाकेला नक्कीच ओ देईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


नगर एमआयडीसीतील श्री रेणुका माता मंदिर येथे अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने एमआयडीसीतील कामगारांसाठी सिटी बस सेवेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी अमी संघटनेचे माजी अध्यक्ष राजेंद्र कटारिया, सुमित लोढा, माजी नगरसेवक सागर बोरुडे, जल अभियंता परिमल निकम, मिलिंद कुलकर्णी, शंतनू गाडे, संजय बंदिस्ती, दिलीप अकोलकर, सागर निंबाळकर, सचिन पाठक, सचिन काकड, दीपक नागरगोजे, श्री पानसरे, श्री सीक्रे, सुकी गुगळे, संतोष लांडे आदींसह नागरिक उपस्थित होते.
उद्योजक मिलिंद कुलकर्णी म्हणाले की रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हीच सर्वात सुरक्षित आहे. कामगार वर्ग आपल्या कामावर येत असताना अपघाताच्या अनुचित घटना घडल्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या कडे सिटी बस सेवेची मागणी केल्यानंतर त्यांनी तातडीने एमआयडीसीतील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावले आमदार संग्राम जगताप हे शहराला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व मिळाले आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करत असल्यामुळे आपले शहर पुढे जात आहे.

कार्यक्रमाची प्रस्ताविक उद्योजक राजेंद्र कटारिया यांनी केले तर आभार प्रदर्शन उद्योजक सचिन पाटक यांनी मांडले यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आ. संग्राम जगताप आणि एमआयडीसीतील उद्योजकांनी सिटी बस सेवेतून प्रवास केला.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular