अहमदनगर दि.११ जुलै
अहमदनगर महानगरपालिकेच्या मार्केट विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या रस्ता बाजु मांडणी फि आणि स्लॉटर फि गोळा करणाऱ्या संस्थेने महापालिकेच्या तिजोरीत पैसे न भरल्याने महानगरपालिकेच्या मार्केट विभागाचे प्रभारी मार्केट विभाग प्रमुख विजयकुमार बालानी यांनी नांदेड येथील गणेश बी भगत यांची श्री.छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या. यांच्या विरोधात कोतोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी हकीकत अशी की अहमदनगर महानगर पालिकेने गणेश बी भगत यांची श्री.छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या. या संस्थेला रस्ता बाजु मांडणी फि व स्लॉटर फि वसुलीचा दि.18.11.2022 रोजी करार करुन त्यांनी दि.01.12.2022 पासुन दि.30.11.2023 याकालावधी करिता ठेका देण्यात आला होता. सदर कालावधीत त्यांनी दरमहिन्याच्या पाच तारखेला 3,90,855/- रुपये भरणे असे एकूण 46 लाख 90 हजार दोनशे पन्नास रुपये जमा करणे ठरले होते. तरी ठेकेदार यांनी ठरवुन
दिलेला हफता मुदतीत नभरल्यास त्यांचे कडुन करार नाम्याचे अटीनुसार थकित रकमेच्या 24%व्याजासह रक्कम आकारण्यात येईल या अटीवर करार करण्यात आला होता.
मात्र दि.01.12.2022 ते दि.05.06.2023 रोजी पर्यंत याकालावधीत ठेकेदार गणेश बी भगत यांनी त्यांचे सोबत केलेल्या करारनाम्यानुसार महानगरपालिका हददीतील रस्ताबाजु मांडणी फि व स्लॉटर फि लोकांकडुन वसुल केली परंतु त्यांनी महानगरपालिकेच्या बँक खात्यात दर महिन्याला 3,90,855/- रुपये असे 187 दिवसाचे प्रतिदिनी 12,850/- रुपये प्रमाणे एकुण 24,02,950/-रुपये असे भरणे अपेक्षीत होते परंतु सदर कालावधीत त्यांनी फक्त 6,90,855/-रुपये एवढीच रक्कम भरली उर्वरित रक्कम भरत नसल्याने महानगरपालिका मार्केट विभागाच्या वतीने त्यांच्याशी वेळोवेळी पत्र व्यवहार आणि संपर्क करून पैसे भरण्यास सांगितले होते मात्र ठेकेदार संस्थेने महानगरपालिकेला कोणताही प्रतिसाद न दिल्याने महानगरपालिकेची एकुण 11,98,995/-रुपयाचे अपहार केला म्हणून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/गाडगे हे करीत आहेत.