अहमदनगर दि.११ जुलै
फ्लेक्स लावण्यावरून आणि फ्लेक्स वरून फोटोची विटंबना करण्यावरून महाराष्ट्रात दंगली पेटलेच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत. त्यामुळे या फ्लेक्सची जबाबदारी लावणाऱ्यावर असती तेवढीच जबाबदारी महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर असते मात्र हम करे सो कायदा असच चित्र सध्या नगर शहरात पाहायला मिळतंय. फ्लेक्स बाबत तर न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे खुलेपणाने उल्लंघन होताना शहरातील ठिकठिकाणी फ्लेक्स बोर्ड पाहिल्यानंतर लक्षात येतेय महानगरपालिका याकडे कधीच गांभीर्याने पाहत नसल्याने नगर शहराचे विद्रुपीकरण खुलेआम सुरू आहे आणि सहनशील नगरकर हे उघड्या डोळ्यांनी पहात आहे.
मात्र एक गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे दुसरीकडे पोलीस प्रशासनालाही अशा बोर्ड कडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात काही दिवसांपूर्वी औरंगजेबाचे फोटो घेऊन मिरवणुकीत नाचण्याचे प्रकार उघडकीस आला होता मात्र याबाबत पोलिसांना उशिरा माहिती कळली होती त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरातील एका नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला नेत्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावले होते मुकुंद नगर परिसरातही असाच एक शुभेच्छा फलक लावण्यात आला होता. या फलकावर काही अज्ञात लोकांनी नेत्याच्या आणि कार्यकर्त्यांच्या तोंडावर विद्रुपीकरण करण्याचा प्रकार केला होता. मात्र हा प्रकारही भिंगार पोलिसांना उशिरा लक्षात आला हा प्रकार थेट पोलीस अधीक्षकांना आधी समजला मात्र भिंगार पोलिसांना हा उशिरा कळला होता अशी माहिती मिळतेय.
प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पुतळे असतील किंवा मंदिर मध्ये धार्मिक स्थळे असतील त्यावर लक्ष ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र ही गुप्तचर यंत्रणा तरी कमी पडतानाच चित्र भिंगार पोलीस स्टेशन अंतर्गत दिसून आलेल आहे.
मुकुंद नगर परिसरात औरंगजेबाचे फोटो झळकवणे असो आणि काही दिवसांपूर्वी लागलेला फलक आणि त्याचे विद्रुपीकरण या दोन्हीही घटना या पथकाला कशा समजल्या नाहीत ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. या घटनेमुळे जर काही अनुचित प्रकार घडला असता तर याला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित राहतोय.
भिंगार परिसरात वाढलेले अवैध धंदे पोलीस स्टेशनच्या काही अंतरावरच बिंगो आणि जुगार अड्डे सुरू असून याकडेही साफ दुर्लक्ष होत आहे. सध्या भिंगार पोलीस स्टेशनमध्ये नवीन अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त झाल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांनी याचा फायदा उचलला असेलही मात्र आता भिंगार पोलीस स्टेशनच्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे कारण भिंगार पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक संवेदनशील ठिकाणे आहेत त्यामुळे एखादी छोटी दुर्लक्ष करण्याची गोष्ट ही मोठी घटना घडवून आणू शकते त्यामुळे आता पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
तर अनेक पोलिसांच्या बदल्या होऊनही अनेक कर्मचारी अजूनही जुन्या पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून आहेत.