Home शहर मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना वैद्यकीय मदत मयत सभासदांचे तीन लाख...

मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना वैद्यकीय मदत मयत सभासदांचे तीन लाख रुपयांचे कर्ज माफ मनपा पतसंस्था सभासदांची कामधेनू – चेअरमन अजय कांबळे

अहमदनगर दि.१३ डिसेंबर –
अहमदनगर मनपा कर्मचारी पतसंस्थेला १०० वर्षांची उज्वल परंपरा आहे. पतसंस्थेने नेहमीच सभासदांचे हित जोपासण्याचे काम केले आहे. सभासदांच्या आरोग्य सुविधेसाठी वैद्यकीय मदत पतसंस्थेच्या वतीने देण्यात येते जेणेकरून सभासदांना वेळेवर उपचार घेता येतात मनपा कर्मचारी पतसंस्था ही सभासदांची कामधेनू आहे. सभासदांच्या अडीअडचणीच्या काळात पतसंस्था तातडीने कर्जरूपी आर्थिक मदत करत आहेत. पतसंस्था आता स्वभांडवली झाली असून सभासदांना व्याजदर कमी करण्यात आले आहे. सभासदांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी व लग्न सोहळ्यासाठी तातडीने कर्ज उपलब्ध करून दिले जाते असे प्रतिपादन चेअरमन अजय कांबळे यांनी केले.
मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना वैद्यकीय मदतीचा धनादेश चेअरमन अजय कांबळे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन कैलास चावरे, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सतीश ताठे, विकास गीते, किशोर कानडे, श्रीधर देशपांडे, बलराज गायकवाड, बाळासाहेब पवार, विजय कोतकर, सोमनाथ सोनवणे, गुलाब गाडे, बाळासाहेब गंगेकर, संचलिका प्रमिलाताई पवार, उषाताई वैराग, कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल म्हणाले की, मनपा पथसंस्थेच्या वतीने सभासद धनंजय शित्रे व पुंडलिक मुंनगेल यांच्या आरोग्याच्या उपचारासाठी प्रत्येकी २५००० हजार रुपयांची वैदकिय मदत दिली आहे.याचबरोबर मयत सभासद कै.भीमराज कोतकर, कै.सतीश रोहोकले,कै.बाळू वैराळ यांचे प्रत्येकी १ लाख रुपयांचे कर्ज निर्लिखित करण्यात आले आहे. या विषयांची सूचना संचालक बाळासाहेब पवार यांनी तर अनुमोदन सोमनाथ सोनवणे यांनी दिले असे ते म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version