अहमदनगर दि.२३ जुलै
शुक्रवारी अहमदनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने या जलवाहीनी दुरुस्तीचे काम म.न.पा.. ने तातडीने हाती घेतलेले आहे. मात्र जलवाहिनी दुरुस्तीचे काम विस्तृत स्वरूपाचे असल्याने त्यास वेळ लागणार आहे.त्यामुळे शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य झाले नसल्याने शनिवार दि २३/०७/२०२२ रोजी रोटेशन नुसार शहर पाणी वाटपाच्या मध्यवर्ती भागास . झेंडी गेट, सर्जेपुरा, मंगलगेट, कचेरी परिसर, हातमपुरा’ रामचंद्र खुंट’ कोठला’ माळीवाडा’ इ .भागाचा तसेच सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलणी, टि.व्ही. सेंटर हाडको, प्रेमदान हाडको, बिशप लॉईड कॉलणी , झोपडी कॅन्टीन परिसर इत्यादी भागाचा पाणी पुरवठा बंद राहाणार असुन तो रविवार दि.२४/०७/२०२२ रोजी नेहमीच्या वेळेत करण्यात येईल.
तसेच रविवार दि.२४/०७/२०२२ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा सिद्धार्थ नगर ‘ लालटाकी’ दिल्लीगेट’ चितळे रोड, तोफखाना, नालेगांव ‘ कापड बाजार , आनंदि बाजार, नवीपेठ, माणिक चौक इ. भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असून या भागास सोमवार दि.२५/०७/२०२२ रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल .
तरी नागरीकांनी याची नोंद घेऊन असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा. असे आवाहन महानगर पालीकेने केलेले आहे.