Homeविशेषडॉ.अमोल बागुल ऐकवणार चंद्रावरचा आवाज व दर्शविणार इस्रोच्या आठ अवकाश यानांची प्रात्यक्षिके

डॉ.अमोल बागुल ऐकवणार चंद्रावरचा आवाज व दर्शविणार इस्रोच्या आठ अवकाश यानांची प्रात्यक्षिके

advertisement

अहमदनगर- दि.२३ ऑगस्ट
अखिल जगतात भारताचा मानबिंदू ठरणाऱ्या चांद्रयान-तीन मोहिमेच्या यशस्वीतेसाठी राबणाऱ्या इस्त्रो शास्त्रज्ञ व मोहिमेवर काम करणाऱ्या भारतीयांना शुभेच्छांमुळे प्रोत्साहन मिळणार आहे.प्रयोगशील संशोधक शिक्षक डॉ.अमोल बागुल यांच्या जाहिरातमुक्त बागुगल वेबसाईटच्या वतीने आयोजित”चांद्रयान-तीन यशस्वीभव”या ऑनलाईन वेबिनारचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बुधवार 23 ऑगस्ट 2023 स.8 ते 10 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.

“अमोल बागुल” या फेसबुक पेजवर संपन्न होणाऱ्या या वेबीनारमध्ये इस्रोच्या 8 अवकाशयानांच्या प्रतिकृतींची प्रात्यक्षिके,चंद्रावरच्या आवाजाची प्रस्तुती ,चांद्रयान-तीनचे लाईव्ह लोकेशन,लँडिंगची विशेष माहिती,इस्त्रोची कामगिरी आदि महत्त्वपूर्ण माहिती व प्रात्यक्षिके डॉ.बागुल सादर करणार आहेत.”चांद्रयान-तीन तुम आगे बढो..भारत तुम्हारे साथ है ” या घोषवाक्यासह डॉ.बागूल यांनी या उपक्रमाचे आयोजन केले असून जास्तीत जास्त खगोलप्रेमी,शिक्षक,पालक,विद्यार्थी यांनी या वेबिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.प्रस्तावित चांद्रयान-तीन याच दिवशी बुधवार दि.23 ऑगस्ट रोजी सायं.5 ते 6 च्या सुमारास चंद्रावर उतरवण्याचे सुतोवाच इस्त्रोने केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular