HomeUncategorizedअर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी आशुतोष लांडगे यांच्या त्या पत्राने उडाली खळबळ.. सुवेंद्र...

अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी आशुतोष लांडगे यांच्या त्या पत्राने उडाली खळबळ.. सुवेंद्र गांधी यांच्यावर केले मोठे आरोप.

advertisement

अहमदनगर दि. २१ ऑगस्ट

अहमदनगर शहरातील अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरण वेगळ्याच वळणावर गेले असून आर्थिक गुन्हे शाखेचे उपाधीक्षक कमलाकर जाधव यांच्याकडे सध्या तपास असून आशुतोष लांडगे यांनी तपासी अधिकारी यांना एक पत्र देऊन खळबळ जनक खुलासा केला आहे.

आशुतोष लांडगे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी दाखल असलेला गुन्हा क्र. १२१/२०२२ या तपासात मुख्य आरोप तत्कालीन चेअरमन माजी खासदार यांच्यावर असून त्यांनी आणि बँक कर्मचाऱ्यांनी परस्पर माझ्या व इतर खातेदारांच्या खात्यातून व कर्ज खात्यातून वेगवेगळ्या इतर खात्यात पैसे वर्ग करून फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच याबाबत काही दैनिकांमध्ये 4 ऑगस्ट रोजी तत्कालीन चेअरमन यांच्या मुलाने सुवेंद्र दिलीप गांधी याच्या संबंधीत दिल्ली येथील गुन्ह्या बाबत बातमी प्रसिद्ध झाली होती.या बातमीत गांधी फिंकॉर्प लिमिटेड या कंपनी बाबत काही महत्त्वाचे पुरावे समोर आले होते.

त्यानंतर मी रजिस्ट्रार ऑफ कंपनी भारत सरकार यांच्या संकेतस्थळा वर आणखीन माहिती घेतल्यास असे निदर्शनास आले की सदरील गांधी फिंकॉर्प लिमिटेड कंपनी ही २०१७ मध्ये म्हणजेच अर्बन
बँक मध्ये माझी कर्ज फसवणूक झाल्याच्याच वर्षी स्थापित झाली आहे व सदरील कंपनी चे
भाग भांडवल (Paid Up Capital) २.५० कोटी आहे. सदरील कंपनीच्या भाग भांडवलासाठी
२.५० कोटी कुठून आले? सदरील २.५० कोटी अर्बन बँक घोटाळ्यातीलच असण्याची दाट
शक्यता आहे.

ह्या गुन्ह्यात मुख्य आरोप तत्कालीन चेअरमन यांनी
अर्बन बँक च्या घोटाळ्यातील रोख रकमा त्यांच्या मुलांनी सुवेंद्र दिलीप गांधी व देवेंद्र दिलीप
गांधी व त्यांचे पार्टनर जयदीप पाटील यांनी गांधी फिंकॉर्प लिमिटेड या कंपनी मार्फत देशा बाहेर नेऊन विल्हेवाट लावली असावी. तसेच सुवेंद्र दिलीप गांधी दिल्ली येथील तथाकथित गुन्ह्यात अटक टाळण्याकरीता मोठ्या रकमा कोर्ट किंवा सदरील गुन्ह्यातील सामनेवाला फिर्यादी यांच्या कडे जमा करण्याची दाट शक्यता आहे. हया रकमा नगर अर्बन बॅक मधील गुन्हयाच्याच असण्याची दाट श्यक्यता आहे.

तरी सदर बाबींची सखोल चौकशी होऊन सदर गैर व्यवहारा बाबत मुख्य आरोप तत्कालीन
चेअरमन यांनी अर्बन बँके च्या घोटाळ्या तील रोख
रकमा त्यांच्या मुलांनी सुवेंद्र दिलीप गांधी व देवेंद्र दिलीप गांधी यांनी कशी विल्हेवाट लावली याची शहानिशा होऊन पुराव्यानिष्ट संस्पष्टीत मांडणी होणे हे न्यायाच्या दृष्टीने आवश्यक आहे. तरी आपणास विनंती की सदर गुन्ह्याच्या तपास कामास गती देऊन सदरील गैर व्यवहारास जबाबदार असलेल्या सुवेंद्र दिलीप गांधी, देवेंद्र दिलीप गांधी यांची कसून चौकशी करण्यात यावी. तसे केल्यास सुवेंद्र दिलीप गांधी व देवेंद्र दिलीप गांधी नगर अर्बन बँके च्या
१५० कोटी घोटाळ्यातील पडद्या मागचे मुख्य सूत्रधार असल्याचे सिद्ध होण्यास पुरावे आपणाला मिळतील.या सर्व बाबींची सखोल चौकशी होऊन सदर गैर व्यवहारा बाबत बँकेतील ठेवीदार आणि खातेदार यांच्यासमोर आणावीत अशी मागणी आशुतोष सतीश लांडगे यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे उपाध्यक्ष कमलाकर जाधव यांना लेखी निवेदन देऊन तसेच पुरवण्यासाठी गांधी फिंकॉर्प लिमिटेडचे काही महत्त्वाचे कागदपत्रे देऊन केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular