मुंबई दिनांक 7 ऑगस्ट
गृह विभागाने नुकतेच महाराष्ट्रातील 35 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर शहराचे उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांची उपविभागीय अधिकारी शिर्डी येथे बदली झाली आहे. तर जयदत्त बावर उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर येथे बदली करण्यात आली आहे. शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांची नगर ग्रामीण पोलीस उपाधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नगर शहर पोलीस उपविभागीय अधिकारी पदी अध्यापनाची ही नियुक्ती झालेली नाही.