Home राज्य बनावट कॉल सेंटर… सीबीआयच्या रडावर कोण ? बनावट कॉल सेंटर ची व्याप्ती...

बनावट कॉल सेंटर… सीबीआयच्या रडावर कोण ? बनावट कॉल सेंटर ची व्याप्ती नगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पनवेल ,

Oplus_0

अहिल्यानगर दिनांक १० ऑक्टोबर

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे रेन फॉरेस्ट या पंचतारांकित रिसॉर्ट मध्ये सुरू असलेल्या कॉल सेंटरवर सीबीआयने छापा टाकला होता. हे बनावट कॉल सेंटर असल्याचे उघडकीस झाले असून आंतरराष्ट्रीय फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी सहा जणांविरोधात प्राथमिक गुन्हा दाखल झाला होता.मात्र सी बी आय च्या तपासात अनेक अधिकाऱ्यांची नावे असल्याचे खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

Oplus_131072

ते अधिकारी राज्यातील ठाणे, नवी मुंबई, रायगड नगर आणि नाशिक जिल्ह्यातील कार्यरत असल्याचे बोलले जाते या अधिकाऱ्यांवर सीबीआय गुप्त पाळत ठेवत असल्याचं बोलले जाते आहे.
यु.एस. गव्हर्मेंट आणि कॅनडा सरकार यांनी या बनावट कॉल सेंटरची पाळमुळे शोधण्यात महत्त्वाची भूमिका घेतली आहे. डिजिटल ट्रेकिंगच्या माध्यमातून लोकेशन घेऊन आणि आयपी ऍड्रेस माहिती करून घेऊन ही सर्व माहिती भारत सरकारला पाठवली होती.भारत देशातून परदेशी नागरिकांना फसवण्याचं हे मोठ प्रकरण असून यामध्ये अनेक मोठमोठे आयपीएस अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये सहभागी असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांना अटक करण्यासाठी सीबीआयने 2018 म्हणजे 1988 विशेष कलम त्याच्यामध्ये 2018 मध्ये झालेली अमेंडमेंट लागू केलेली आहे. लवकरच या अधिकाऱ्यांना सीबीआयकडून नोटीस बजावली जाणार असल्यास माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाची सुरुवात जरी नाशिक मधून झाली असली तरी याची पाळेमुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत. मीरा भाईंदर,ठाणे ,कर्जत, नगर जळगाव,अशा अनेक ठिकाणावरून परदेशी नागरिकांना म्हणजेच यु.एस. कॅनडा, ब्रिटन या ठिकाणच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक रूपात फसवण्यात आले आहे. प्राथमिक गुन्हा सहा जणांवर दाखल झाला असला तरी याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

त्यावेळी जे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी नियुक्ती होते त्या अधिकाऱ्यांनी या बनावट कॉल सेंटरला आशीर्वाद देऊन मोठी माया कमवली असल्याचे बोलले जात आहे. आता ते वरिष्ठ अधिकारी राज्यात विविध ठिकाणी बदली करून नियुक्तीस गेले आहेत. मात्र तरीही त्यांच्यावर सीबीआय पाळत ठेवून आहे.

अधिकाऱ्यांनी बनावट कॉल धारकांना आशीर्वाद देऊन त्यामधून मोठी आर्थिक रक्कम घेतली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता सीबीआयच्या रडावर कोण असणार यावर चांगली चर्चा सुरू आहे. काही अधिकाऱ्यांची कुटुंबांच्याही यामध्ये समावेश असल्याचा समोर आले आहे.

इंटीलीजेन्स ब्युरो सुद्धा कामाला लागले असून काही दिवसातच मोठी नावे समोर येणार आहेत. त्यामुळे सध्या ती नावे कोणती यावर चांगले तर्कवितर्क सुरू आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version