अहिल्यानगर १७ डिसेंबर
थकित करदात्यांवर महानगरपालिकेच्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली असून नागरिकांनी लवकरात लवकर आपला थकीत कर महानगरपालिकेत जमा करावा असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे सध्या कर वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली असून. अहिल्या नगर महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या आदेशाने महानगरपालिकेच्या उपयुक्त श्रीमती प्रियंका शिंदे, प्रभाग अधिकारी बबनराव काळे व कर संकलन अधिकारी विनायकराव जोशी व कर निरीक्षक ऋषिकेश लाखापती तसेच वसुली लिपिक संजय तायडे संदीप कोलते राजेश आनंद सागर जाधव किशोर देठे शंकर अवघडे गोरक्ष ठुबे यांच्या पथकाने आज शहरातील काही ठिकाणी जाऊन मालमत्ता सील करण्याची कारवाई केली आहे.
मार्क स्केवर अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या मालमत्ता धारक स्मिता कुंदन कांकरिया व ज्योती दाभाडे यांच्याकडे मालमत्ता कराची एकूण थकबाकी रुपये 4,02 762 इतकी होती. त्यांनी ती भरण्यास असमर्थता दाखवली त्यामुळे झेड के बॉलीवूड कॅफे सील करण्यात आले असून तसेच वार्ड क्रमांक 47 भिंगारदिवे मळा बालिकाश्रम रोड सावेडी येथील मालमत्ता धारक श भागवत यांचा गणपतीचा कारखाना असून त्यांच्याकडे मालमत्ता कराची एकूण थकबाकी रुपये २,३०,१९७ इतकी आहे व ती त्यांनी भरण्यात असमर्थता दाखवली त्यामुळे त्यांच्या गणपतीचा कारखाना सील करण्यात आला आहे.
वार्ड क्रमांक ६३ सिविल हडको मालमत्ता धारक श्री शांतीलाल दत्तात्रय आऔटी यांच्याकडे एकूण मालमत्ता कराची थकबाकी रुपये २,५१,८७९ इतकी आहे त्यांच्याकडे वसूल करण्यासाठी गेलो असता त्यांनी एका आठवड्यात संपूर्ण रक्कम भरण्याचे कबूल केल्याने सदरची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली असून वार्ड क्रमांक ५९ मधील मालमत्ता धारक लिलाबाई धोंडीराम राठोड संभाजीनगर रोड यांच्याकडे हॉटेल मातोश्रीची एकूण मालमत्ता करायची थकबाकी रुपये १,४३,४७२ इतके असून त्यांच्याकडे त्या मालमत्ता धारकाने एक आठवड्याची मुदत मागितल्याने त्यावर कारवाई करण्यात आली नाही.
महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अहिल्यानगर वासियांना आवाहन करण्यात आले असून ज्या मालमत्ता धारकाकडे मालमत्ता कराची थकबाकी असेल त्यांनी स्वतः येऊन मनपात जमा करावी अन्यथा कारवाईला समोर जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.