अहिल्यानगर दिनांक 17 डिसेंबर :
महाराष्ट्र राज्य सरकारने गोमातेला राज्यमाता घोषित केले असून गोवंश हत्या बंदी कायदा असताना देखील काही समाजकंटक त्या कायद्याची पायमल्ली करत आहे, गेल्या आठवड्यात गुन्हे अन्वेषण पथकाकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील झेंडीगेट, ममतापूर, श्रीरामपूर आदींसह विविध ठिकाणच्या अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून हजारो गोवंश वाचवण्यात आले असून 50 हजार किलो गोमास जप्त करण्यात आले आहे, आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन देखील अवैद्य कत्तलखाने नष्ट करण्याची कोणतीच कारवाई झालेली नाही, तरी तातडीने कत्तलखाने भुईसपाट करावी, हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे हिंदू समाज प्रचंड क्रोधीत झाला आहे तरी कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो ,निवेदनासोबत पुरावे देखील सादर करत असून पुढील कारवाई तातडीने करावी अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने गोरक्षक प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांत ऋषिकेश भागवत यांनी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी नगरसेवक विपुल शेटिया यांच्यासह गोरक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान पोलीस प्रशासन व आ. संग्राम जगताप यांच्या सहकार्यातून गेल्या आठवड्यात गुन्हे अन्वेषण पथकाकडून अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून हजारो गोवंश वाचवल्याबद्दल बजरंग दलाच्या वतीने यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि आ.संग्राम जगताप आदींचा गो मातेची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला
अहिल्यानगर जिल्हा हा गोहत्या मुक्त झाला पाहिजे यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, गाय ही हिंदू धर्माची गोमाता आहे, गाईंना वाचविण्यासाठी आमचे सहकार्य राहील असे आ.संग्राम जगताप म्हणाले
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने अवैध कत्तलखान्यावर मोठी कारवाई केली जात असून गुन्हे दाखल केले आहे गोहत्या करणाऱ्यांना तडीपार केले जाईल, गोरक्षकांनी देखील कायद्याचे पालन करावे जेणेकरून अनुचित घटना घडणार नाही, कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करीत असताना एखादा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही तरी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, आम्ही नेहमीच कठोर कारवाई करत आहोत अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी दिली.