अहमदनगर दि.२३ ऑगस्ट
अहमदनगर महानगर च्या कोंडवाडा विभागाच्या कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करून कोंडवाडा विभागाच्या गाडीतून गाय घेऊन जाण्याचा प्रकार नगर शहरातील जिल्हा रुग्णाच्या समोर भेटला आहे याबाबत धक्काबुक्की करणाऱ्या गुन्हा दाखल करण्यासाठी महानगरपालिकेचे कोंडवाडा विभागाचे कर्मचारी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
अहमदनगर महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागातील कर्मचारी आज सकाळी शहरातील मोकाट फिरणारे जनावरे पकडत असताना जिल्हा रुग्णालयासमोर दोन मोकाट जनावरे आढळून आले असता त्यांनी ते पकडून कोंडवाडा विभागाच्या गाडीत टाकले होते. मात्र यावेळी येथे आलेल्या दोन ते तीन इसमाने कोंडवाडा विभागाचे कर्मचारी ज्ञानेश्वर झरेकर यांना धक्काबुक्की करून त्यांनी पकडलेले एक जानवर त्यांच्या ताब्यातुन घेऊन गेले.
याबाबत कोंडवाडा विभागाचे कर्मचाऱ्यांनी तातडीने तोफखाना पोलीस ठाणे गाठले असून त्या धक्का बुक्की करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. एकीकडे नगर शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे अनेक वेळा अपघात होत असतात मात्र महानगरपालिका जेव्हा कारवाई सुरुवात करते तेव्हा असे काही लोक अशा मोकाट जनावर आपल्या मालकी हक्क दाखवतात त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यास अडचण निर्माण होते.