Homeशहरमनपा कर्मचारी कल्याण निधीच्या वतीने दहावी-बारावीतील गुणवंत पाल्यांचा सत्कार संपन्न. आजचा...

मनपा कर्मचारी कल्याण निधीच्या वतीने दहावी-बारावीतील गुणवंत पाल्यांचा सत्कार संपन्न. आजचा विद्यार्थी उद्याच्या भारताचे उज्वल भविष्य आहे – महापौर रोहिणी ताई शेंडगे

advertisement

अहमदनगर दि.१२ डिसेंबर-
मनपा कर्मचारी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत नागरिकांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावत असतात. मनपा कर्मचारी आपली नोकरी करत असताना आपल्या कुटुबांकडे दुर्लक्ष होत असते.मात्र मनपा कर्मचारी कल्याण निधीच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या दहावी बारावीतील गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करून गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचे काम केले जाते ही बाब कौतुकास्पद आहे पाल्यांनीही आपले ध्येय निश्चित करून मेहनतीच्या व चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे आपल्या आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचे फळ मिळून द्यावे. विद्यार्थ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रामध्ये विविध करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये भाग घेऊन मिळालेल्या संधीचे सोने करावे महापालिका नेहमीच कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहत असते. आजचा विद्यार्थी उद्याच्या भारताचे उज्वल भविष्य आहे असे प्रतिपादन महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी केले.

मनपा कर्मचारी कल्याण निधीच्या वतीने गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ महापौर रोहिणीताई शेडगे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी  आयुक्त डॉ.पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे, मनपा कर्मचारी कल्याण निधीचे अध्यक्ष उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे, राष्ट्रवादी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, सचिव शेखर देशपांडे, सदस्य अशोक साबळे, संगीता झोडगे, राजू लयचिट्टी, बलराज गायकवाड,अंबादास साळी,आदींसह कर्मचारी व पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले की, मनपा कर्मचारी कल्याण निधीची स्थापना कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी झाली आहे. आपले काहीतरी देणे लागते या भावनेतून कल्याण निधी समितीच्या वतीने नेहमीच कर्मचारी व त्यांच्या पाल्यांच्या उद्धारासाठी काम करत आहे. शालेय शिक्षण घेत असताना पाल्यांनी आपले ध्येय निश्चित करून पुढील वाटचाल करावी. शालेय शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राकडे वळावे जेणेकरून शिक्षण घेत असताना शारीरिक क्षमता वाढवली पाहिजे या माध्यमातून बौद्धिक क्षमता ही वाढली जाते विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी मैदानी खेळाची खरी गरज आहे असे ते म्हणाले.
मनपा कर्मचारी कल्याण निधीचे अध्यक्ष उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे म्हणाले की, कोरोना संकट काळामध्ये कर्मचाऱ्यांच्या दहावी-बारावीतील पाल्यांचा कौतुक सोहळा करण्यात आला नव्हता तीन वर्षातील सुमारे १५० गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला आहे. मनपा कर्मचारी कल्याण निधी समिती कर्मचारी व पाल्यांच्या सदैव पाठीमागे उभे राहत असते कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यावर त्यांचा सत्कार करण्यात येतो असे ते म्हणाले.
यावेळी प्रा.माणिकराव विधाते यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सचिव शेखर देशपांडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अंबादास साळी यांनी मानले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular