Homeशहरअहमदनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता थकबाकीपोटी केलेल्या कारवाईत दोन मालमत्ता सील

अहमदनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता थकबाकीपोटी केलेल्या कारवाईत दोन मालमत्ता सील

advertisement

अहमदनगर दि.१२ डिसेंबर

अहमदनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागाकडून थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येत असून महानगरपालिकेच्या बुरुडगाव प्रभाग समिती क्रमांक चार विभागाकडून मालमत्ताधारक राजेश कुंदनमल उपाध्ये यांच्या मालकीच्या सक्कर चौक येथील तळघर गाळा नंबर ७ जीम या मिळकतीवरील मालमत्ता कराची थकबाकी रक्कम रु.३,५०,२६८/- पोटी आज प्रभाग समितीने गाळा नंबर ७ जीमला सिल करुन
जप्तीची कारवाई करण्यात अली या कारवाईमध्ये प्रभाग अधिकारी श्री. नानासहेब गोसावी
यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरिक्षक श्री. व्ही. एन. बालानी, वसुली लिपीक राजेंद्र म्हस्के, हबीब शेख,
बाळासाहेब सुपेकर यांनी सहभाग घेतला.

तसेच प्रभाग समिती क्रमांक दोन शहर विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या हातमपूरा येथील अमेरिकन मिशन मुलांचे बोर्डींग यांच्या कडे असलेली धकबाकी रक्कम रु.४,६७,५८०/-भरली नसल्याने अखेर आज ही मालमत्ता जप्त करून सील लावण्यात आले आहे. या कारवाईमध्ये प्रभाग अधिकारी श्री. आर.बी. कोतकर, कर निरिक्षक श्री. एस. टी. गोडळकर, वसुली लिपीक एस. डी. धामणे, एस. एम.साबळे, ए.एन. गोयर,पी.ए. इंगळे यांनी सहभाग घेतला.

सर्व नागरीकांनी आपले मिळकतीवरील थकीत कराचा भरणा करुन जप्तीसारखी कटु कारवाई टाळावी, असे मनपाने आवाहन केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular