अहमदनगर –
अनिल राठोड जन्म १२ मार्च १९५० – निधन ५ ऑगस्ट २०२० अहमदनगर शहरामध्ये अनिल भैय्या राठोड म्हणजे प्रत्येक घराघरांमध्ये पोहचलेले नाव लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आवडते व्यक्तिमत्व म्हणजे अनिल भैय्या राठोड हे नगरकरांना सांगण्याची गरज नाही. अनिल भैय्या राठोड यांची निवडणूक म्हटले की त्यांना जमवाजमा कधीच करावी लागली नाही अनिल भैय्या चालत निघाले की त्यांच्यामागे आपोआप हजरोंची गर्दी जमा व्हायची हे चित्र नगरकरांनी अनेक वेळा पाहिले आहे. भैय्या म्हणजे आपल्या घरातील एक सदस्य असल्यासारखे नगरकर त्यांना आपल्या अडचणी सांगत 24 तास सात दिवस अहोरात्र काम करणारा नेता म्हणजे अनिल भैय्या राठोड.
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात सलग चार वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे आणि तेही दरवर्षी वाढत्या मताधिक्याने निवडून येण्याचा पराक्रम करणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे अनिल भैया राठोड. आमदार म्हणून नव्हे तर शहरातील प्रत्येक घरातील एक सदस्य म्हणून त्यांनी काम केले त्यामुळे तळागाळापासून मोठ्या लोकांपर्यंत अनिल भैय्या राठोड यांची भुरळ नगरकारांना पडली होती. काम कोणतेही असो भैय्या कडे गेले म्हणजे काम होणारच असा दृढ विश्वास नगरकरांच्या मनात होता त्यामुळे शिवालय या त्यांच्या कार्यालयात नेहमीच गर्दी असायची.
एक पक्ष एक विचार आणि एकनिष्ठा या विचारावर त्यांनी शिवसेनेला कधीही सोडले नाही महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा तेव्हा अनिल भैय्या राठोड हे शिवसेनेच्या म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिले त्यांच्या या कामाचे फलित म्हणून त्यांना शिवसेनेने मंत्री पदही दिले होते.
मात्र अनिल भैय्या राठोड यांनी कधीही मंत्री पदाची मुजोरी दाखवली नाही त्यांना मंत्री पदापेक्षाही नगरकरांच्या सेवेत कायम राहणं हेच पसंत होतं त्यामुळे हे नेहमीच नगरकरांच्या गराड्यात राहणे पसंत करत होते. शिवसेनेचे उपनेते म्हणून त्यांनी काम केले नगर शहराचा ढाण्या वाघ म्हणून नगर शहरातील गुंडागर्दी विरुद्ध नेहमीच आवाज उठवणारा एकमेव नेता म्हणजे अनिल भैय्या राठोड यांचे नाव नेहमीच घेतले जाईल. अनेक वेळा सरकारी अधिकाऱ्यांना तोंडावर सूनवून त्यांनी कार्यकर्त्यांचं किंवा नागरिकांचे काम होणे हे महत्त्वाचे समजले त्यामुळे सरकारी अधिकारी अनिल भैय्या राठोड येणार म्हणले की थरथर कापत शिवसेना स्टाईल आंदोलन कसे करायचे हे अनिल राठोड यांनी अनेक वेळा दाखवून दिले.
हिंदुत्वाचा वसा घेऊन सलग चार वर्ष अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात त्यांनी भगवा फडकवला त्यांना निवडणुकीत पाडण्यासाठी अनेक राजकीय नेते एकत्र येत मात्र जनतेच्या बळावर अनिल भैय्या राठोड निवडणूक जिंकून येत असत निवडणूक म्हणजे फक्त अर्ज भरणे एवढेच अनिल भैय्या राठोड यांचे काम होते कारण संपूर्ण नगर शहरातील जनता त्यांच्या मागे न सांगताही ठामपणे उभा राहत असल्यामुळे त्यांनी निवडणुकीत हरण्याची चिंता कधीच केली नाही.
हिंदू धर्माचा अभिमान आणि शहरात भगवा फडकत ठेवण्याचे स्वप्न त्यांनी अखेरपर्यंत पाहिले होते मात्र कोविडच्या काळात अचानक झालेल्या कोविड मुळे अनिल भैय्या राठोड यांच्यावर काळाने झडप घातली आणि पाच ऑगस्ट 20 20 मध्ये त्यांच निधन झालं आणि संपूर्ण नगर पोरक झाल्यासारखं त्यावेळी वाटले अनेक निष्ठावान शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रूतरळले होते मात्र ढाण्या वाघ अचानक गेल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता.
अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नगरसेवक बनवण्याचे काम फक्त अनिल राठोड यांनीच नगर शहरामध्ये केल होत सर्वसामान्य घरातील तरुण मुलांना नगरसेवक मोठया पदावरही त्यांनी स्थान दिले होते. त्यामुळे सर्वसामान्य नगरकर त्यांच्या पाठीशी नेहमीच उभा राहिले होते. मात्र शेवटच्या काळात निवडणुकीत पक्षातीलच काही लोकांनी दगा दिल्याने अनिल राठोड यांचा पराभव झाला याचे शल्य त्यांच्या मनाला लागून राहिलं होतं. अनिल राठोड आणि निवडणूक हे समीकरण वेगळे बनलं होतं अनिल राठोड यांना हरवणे शक्य नसल्याने अखेर त्यांच्याच फौजे मधील काही सैनिक फितूर करून त्यांना हरवण्यात आले असे शिवसेनेमध्ये अजूनही बोलले जाते.
अनिल भैय्या राठोड म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच अनिल भैय्या राठोड हे समीकरण नगर मध्ये होते. कोणतेही आंदोलन असो कोणतीही समस्या असो शेवट म्हणजे शिवालय आणि समाधान म्हणजे अनिल भैय्या राठोड हे नगरकरांचे एक वेगळेच विश्व होतं आज अनिल भैय्या राठोड हे आपल्यात नाहीत मात्र त्यांचे आचार विचार नेहमीच आपल्या स्मरणात राहील आज अनिल राठोड आपल्यात नसले तरी त्यांचे असंख्य कट्टर शिवसैनिक आजही भैय्या या नावाने प्रेरित होऊन काम करत आहेत.
त्यांचा आज स्मृतिदिन या स्मृतिदिनानिमित्त अनिल भैय्या राठोड यांना आवाज महाराष्ट्र वेब पोर्टलच्या वतीने आणि वाचकांच्या वतीने नमनआणि त्यांच्या चरणी हा लेख अर्पित ..