अहमदनगर दि.९ मे
अहमदनगर शहरातील सिद्धीबागेतील जलतरण तालावस स्व.माजी आमदार धर्मवीर अनिल भैय्यां राठोड नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती तसेच मुकुंदनगर भागातील वन विभाग कार्यालय ते शहा शरीफ दर्गा पर्यंतच्या मार्गाला शहा शरीफ मार्ग असे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती या दोन्ही मार्गाला नाव देण्याचा ठराव महानगरपालिका सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.
अहमदनगर शहराचे आमदार म्हणून पंचवीस वर्षे कारकिर्दी केलेले अनिल भैय्यां राठोड यांचे नाव कायमस्वरूपी नागरकरांच्या लक्षात राहणार आहे
मोहीमेवर असताना ते शाह शरीफ बाबांची महती ऐकून त्यांच्या दर्शनाला आले तेव्हा त्यांनी शाह शरीफ बाबांना त्यांच्या नावावरून मुलांची नावं ठेवण्याची परवानगी मागितली. त्यांच्या नावावरूनच एका मुलाचं नाव शहाजी आणि दुसऱ्याचं नाव शरीफजी ठेवण्यात आलं.असा इतिहास आहे.हिंदू मुस्लिम समाजाच्या ऐक्याचे हे प्रतीक समजले जाते.