अहमदनगर दि.१२ ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील एकविरा चौक येथे १५ जुलै रोजी राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेनंतर याप्रकरणी पोलिस तपासात आरोपी म्हणून भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. स्वप्नील शिंदे याच्याबरोबर आणखीन सात ते आठ आरोपी असून या सर्वांनी मिळून अंकुश चत्तर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून क्रूरपणे हत्या केली होती. सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
या घटने बाबत बाळासाहेब सोमवंशी, यांनी दिलेल्या तक्रारी वरुन तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये भादविक 307, 323, 324, 325, 326, 143, 147, 148, 149, 108 सह आर्म ऍ़क्ट 3/25 व म.पो.का.क. 37 (1)(3)/135, क्रि.लॉ.ऍ़.अ. 7 प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी अंकुश चत्तर हा उपचारा दरम्यान मयत झाल्याने गुन्ह्यास 302 हे वाढीव कलम लावण्यात आले होते.
या प्रकरणातील आरोपी वाशिम येथील हॉटेल गुलाटी हॉटेल मधून स्वप्निल रोहिदास शिंदे, अक्षय प्रल्हादराव हाके ,अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कु-हे ,सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे मिथुन धोत्रे ,राजू फुलारी यांना पोलिसांनी अटक केली होती.
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्याकडे तपासा साठी होते मात्र गुन्ह्याची गंभीरता पाहता हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या प्रकरणाचा तपास करून या गुन्ह्याचे चार्जशीट आज अहमदनगर जिल्हा न्यायालयात पाठवले आहे.
या प्रकरणातील आरोपी स्वप्निल शिंदे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खुन, खुनासह जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा अशा इतर कलमान्वये गंभीर स्वरुपाचे एकुण सात गुन्हे दाखल आहेत
आरोपी अभिजीत बुलाख हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न असा गंभीर स्वरुपाचा एक गुन्हा दाखल आहे तर आरोपी सुरज कांबळे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द गंभीर दुखापतकरणे, जिवे मारण्याची धमकी देणे, आर्म ऍ़क्ट व इतर कलमान्वये एकुण -6 गुन्हे दाखल आहेत
आरोपी महेश कु-हे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न असा गंभीर स्वरुपाचा एक गुन्हा दाखल आहे
आरोपी मिथुन धोत्रे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन येथे चोरीचा एक गुन्हा दाखल आहे.
तर या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावा अशी मागणी बाळासाहेब सोमवंशी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.