अहमदनगर दि.१२ ऑक्टोबर
अन्नधान्य वितरण कार्यालयातील शहर पुरवठा विभागातील अनागोंदी कारभारा बाबत आणि भ्रष्टाचारा विरोधात भाजपचे नेते करण डापसे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
शहर पुरवठा विभागात रेशन कार्ड संबंधीचे कोणतेही काम पैसे घेतल्याशिवाय आणि वेळेवर कधीच होत नाही. जर एखाद्या व्यक्तीला नवीन रेशन कार्ड घ्यायचे असेल तर त्याला अनेक चकरा माराव्या लागतात तसेच जवळपास चार ते पाच हजार रुपये घेऊन त्या व्यक्तीला रेशन कार्ड दिले जाते. त्याचप्रमाणे काही स्वस्त धान्य दुकानदार गोरगरिबांसाठी आलेले धान्य त्यांना देत नाही कारण या स्वस्त धान्य दुकानदारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना हप्ते जात असल्याने यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही अथवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही अनेक वेळा स्वस्त धान्य दुकानदारांकडे सर्वसामान्य रेशन कार्डधारक धान्य मागण्यासाठी गेल्यावर त्यांना ठराविक उत्तर मिळते अद्याप धन्य वरून आले नसल्यामुळे तुम्हाला धान्य मिळणार नाही हे नेहमीचे उत्तर अनेक रेशन कार्डधारकांना दिले जाते. तर दुसरी कडे शासन दरबारी 100% धान्य वाटप झाल्याचा रिपोर्ट
दिला जातो.
तर आणखी एक धक्कादायक प्रकार या ठिकाणी उघडकीस आला असून नगर शहरात राहणारे कर्णबधिर मूकबधिर असणारे दिनेश शहापूरकर यांनी नवीन रेशन कार्ड मिळवण्याकरता दहा ऑगस्ट रोजी अहमदनगर शहर पुरवठा विभागाकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून रितसर अर्ज केला होता. याप्रकरणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी शहापूरकर यांच्या निवासस्थानी जाऊन पडताळणी केली मात्र शहापूरकर यांना स्वतःचे घर नसून ते भाड्याच्या घरात राहतात. मात्र दिव्यांग असल्यामुळे शहापूरकर यांच्या मावस भावाने या प्रकरणी अनेक वेळा पुरवठा विभागात येऊन या प्रकरणाबाबत विचारणा केली होती मात्र दिव्यांग असलेल्या शहापूरकर यांना रेशन कार्ड देण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पिवळे रेशन कार्ड हवे असल्यास तुम्हाला पैसे द्यावे लागतील अशी मागणीच एका महिला अधिकाऱ्याने केल्याने दिव्यांग असलेल्या शहापूरकर यांना धक्का बसला आणि अखेर त्यांनी करण डापसे यांच्या कानावर ही गोष्ट घालून न्याय मिळावा अशी मागणी केली याबाबत आता कारण डापसे यांनी शहापूरकर यांच्या बाबत घडलेला प्रकार आणि या विभागात चाललेला अनागोंदी कारभारा बाबत लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
शहापूरकर यांच्यासारख्या दिव्यांग व्यक्तीला असा अनुभव येत असेल तर इतर व्यक्तींना या विभागाकडून कशा प्रकारे वागणूक दिली जात असेल याची याची प्रचिती येत आहे.या विभागातील अनेक कर्मचारी वारंवार गैरहजर राहतात आणि अनेक नागरिकांची कामे खोळंबून राहत असल्यामुळे नागरिकांना विनाकारण चकरा माराव्या लागतात त्यामुळे पुरवठा विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कर्मचाऱ्यांना शिस्त लावावी तसेच भ्रष्टाचार थांबवा अशी मागणी ही करण डापसे यांनी केली आहे.