Home क्राईम आत्महत्या सत्र अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आत्महत्या

आत्महत्या सत्र अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आत्महत्या

अहमदनगर दि.५ ऑक्टोबर

पाच दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्हा दलातील पोलीस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांनी सुसाईड नोट लिहून सर्विस रायफलने गोळी मारून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी काही पोलीस अधिकारीच आरोपीच्या केंद्रात असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेचे विस्मरण होत नाही तोच दसऱ्याच्या दिवशीच आणखी एक पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलीस दलात एकच उडाली आहे. बेलवंडी पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे सहायक फौजदार सुनील धोंडिबा मोरे यांनी श्रीगोंदा शहरातील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे

आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही मोरे एक महिन्यापासून रजेवर असल्याचे माहिती मिळत आहे. श्रीगोंदा पोलिसांना याबाबत माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयत मोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत ऐन सणासुदीच्या दिवशी एका पोलिस कर्मचाऱ्याने अशी आत्महत्या केल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version