अहमदनगर दि.६ मार्च
राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नारायण गर्जे यास पंधरा हजार रुपयांची लास घेताना नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ज्ञानदेव गर्जे हा राहुरी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. राहुरी येथील एका परवानाधारक दारू विक्री करणाऱ्या दुकानदाराला मोठ्या गुन्ह्यात अडकून दारू विक्रीचा परवाना रद्द करण्याची धमकी देऊन दरमहा वीस हजार रुपये हप्ता ज्ञानदेव गर्जे याने मागितला होता. मात्र तडजोड करून दरमहा पंधरा हजार रुपये हप्ता देण्याची कबुली दारू विक्री करणाऱ्या दुकानातील कर्मचाऱ्याने केल्याने ज्ञानदेव गर्जे याने पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारत असताना नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहात पकडले आहे.
ज्ञानदेव नारायण गर्जे,स. पो. उपनि राहुरी पोलिस स्टेशन, अहमदनगर.राहणार – भाग्योदय रो हाउस तपोवन रोड, राजबिर हॉटेल समोर मुक बधीर विद्यालय जवळ अहमदनगर याच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कामगिरी नाशिकचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक निलिमा केशव डोळस पोलिस नाईक संदीप हांडगे.पोलिस शिपाई सुरेश चव्हाण यांनी केली आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक*@ दुरध्वनी क्रं. – 0253-2578230*@ टोल फ्रि क्रं. 1064