अहमदनगर दिनांक ५ फेब्रुवारी
फेसबुक वापरकर्त्यांना मोठा झटका बसला असून अनेकांचे फेसबुक इंस्टाग्राम बंद पडले आहेत. यामुळे फेसबुक इंस्टाग्राम वापरकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून नेमका हा प्रकार कशामुळे झाला याबाबत अद्यापही काही माहिती आलेली नाही. मात्र अनेकांनी आपल्या सोशल मीडियावरील फेसबुक आणि इंस्टाग्राम चालू करण्याबाबत अनेक वेळा प्रयत्न केला मात्र लॉगिन होत नसल्यामुळे अनेक जणांना आता चिंता लागलेली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्त्यांची मोठी संख्या असल्यामुळे आणि याचा वापर सतत होत असल्यामुळे अचानक या दोन्हीही सोशल मीडियावरील साईट बंद झाल्यामुळे वापरकर्त्यांना मध्ये एक मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.