अहमदनगर दि.१८ सप्टेंबर
अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर मधील एकविरा चौक परिसरात १५ जुलै रोजी अंकुश चत्तर यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला होता. या हल्यानंतर त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्यानंतर याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये बाळासाहेब सोमवंशी यांच्या फिर्यादी वरून अहमदनगर महानगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह अभिजित बुलाख,सुरज कांबळे,महेश कुऱ्हे,मिथुन धोत्रे, यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून यामधील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत या आरोपींवर नगर शहरातील आणि महाराष्ट्रातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.
हे सर्व गुन्हेगार प्रवृत्तीचे आरोपी आहेत आणि समाजासाठी घातक असून त्यांच्यापासून मला, माझ्या कुटुंबियांना तसेच अंकुश याची पत्नी व दोन लहान मुलांना आणि इतर कुटुंबीयांना जीवितेचा धोका असून जेलमध्ये असायला सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करुन सदर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देऊन मयत अंकुश चत्तर आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा असे निवेदन अंकुश चत्तर खून प्रकरणातील फिर्यादी असलेले बाळासाहेब भानुदास सोमवंशी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिले आहे. तसेच या आरोपींविरोधात सात दिवसाच्या आत मोका अंतर्गत कारवाई केली गेली नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यासमोर मयत अंकुश चत्तर याची पत्नी तसेच दोन लहान मुले आणि फिर्यादी यांच्यासह चत्तर कुटुंबीय २८ सप्टेंबर पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
तसेच स्वप्नील शिंदे याच्या विरुध्द खुन,
खुनासह जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा अपहरण,ताबा मारणे व इतर कलमान्वये गंभीर स्वरुपाचे सात अत्यंत गंभीर गुन्ह्यांची नोंद असून अभिजित बुलाख याच्यावर खुणाचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल आहे. तर सुरज कांबळे याच्यावर सुद्धा जीवे मारण्याची धमकी देणे मारहाण करणे,अपहरण करणे अशा सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.महेश कुऱ्हे याच्यावर सुद्धा जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल असून मिथुन धोत्रे याच्यावरही तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.
हे सर्व सराईत आणि कुख्यात आरोपी असून यांच्यामुळे समाजालाही धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करावी आम्ही लोकशाहीच्या मार्गाने लढा देत राहणार असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.