Homeक्राईमसरकारमान्य च्या नावाखाली "बेकायदेशीर" असलेला "तो" धंदा खुलेआम कायदेशीरपणे सुरू .. ना...

सरकारमान्य च्या नावाखाली “बेकायदेशीर” असलेला “तो” धंदा खुलेआम कायदेशीरपणे सुरू .. ना सरकारला महसूल न जीएसटी मग पैसा जातो कोणाकडे? आय जी पथकाने कारवाई करूनही “ती” दुकाने पुन्हा सुरू ..म्हणजेच त्या “ढालो”चे हात कानून पेक्षाही लंबे…

advertisement

अहमदनगर दि.१८ सप्टेंबर

सरकारमान्य लॉटरी असे नाव टाकून अहमदनगर जिल्ह्यात आणि शहरात विविध ठिकाणी ऑनलाईन लॉटरीचे दुकाने सुरू आहेत. मात्र यामागचं सत्य अत्यंत धक्कादायक असून महाराष्ट्र सरकारने कोणतीही सरकार मान्य लॉटरी दुकाने चालवण्याची परवानगी दिली नसताना सरकार मान्य लॉटरी दुकाने असे नाव लावून खाजगी लोकच हा सर्व पैसा खिशात टाकण्याचं काम सध्या करत आहेत

या मागचा मास्टर माईंड हा कोपरगावचा असून या “ढालो” मागे कोणाचा एवढा मोठा वरदहस्त आहे की ज्याने लॉटरी दुकान चालवण्यासाठी दिलेली यंत्रसामुग्री महाराष्ट्र शासनाच्या नावाने सर्रासविक्री करून जनतेला खुलेआम लुटण्याचे काम सुरू आहे.

ही लॉटरीची दुकाने संपूर्णपणे बेकायदेशीर असून जर हे सरकार मान्य आहे तर मग या लॉटरी दुकानावर जीएसटी नंबर का नाही म्हणजे ना सरकारला पैसा नाही जीएसटी मग हा सर्व पैसा जातोय कोपरगावच्या म्होरक्या असलेल्या “ढालो” च्या खिशात. विशेष म्हणजे या लॉटरीचा निकाल कोपरगावच्या “ढालो”च्या घरातूनच काढला जातो. ज्या आकड्यावर सर्वात कमी खेळ असतो त्याच आकड्याचा निकाल घरी बसून काढला जातो त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा पैसा थेट त्या “ढालो” घरी जात असून ना सरकारला कोणताही कर ना जीएसटी … त्यामुळे हा सर्व पैसा काही ठराविक व्यक्तींच्या खिशात जात आहे. यामध्ये सरकारची शुद्ध फसवणूक खुलेआम सुरू आहे.

हे सर्व बेकायदेशीर असतानाही सरकारमान्य नाव लावून हा बेकायदेशीर धंदा कायदेशीरपणे सुरू आहे. मात्र याकडे कोणतीच यंत्रणा लक्ष देत नसल्यामुळे सर्वसामान्यांसह अनेकांना लुटण्याचा काम राजरोसपणे आणि कायदेशीरपणे सुरू आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या आय जी पथकाने यापैकी काही लॉटरी दुकानांवर छापे टाकून कारवाई केली होती. त्यानंतर काही काळ की दुकाने बंद होती त्यामुळे तो छापा बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी दुकानावरच होता असे असतानाही मात्र हे दुकाने पुन्हा एकदा खुलेआम सुरू झाले आहेत.

त्यामुळे त्या कोपरगावच्या “ढालो” चे हात कानून से ही लांबे है असच दिसून येतेय. या सरकारमान्य लॉटरी बाबत जीएसटी किंवा महसूल खाते यांनी तपासणी करणे आणि माहिती देणे गरजेचे आहे. सरकारचा करोडो रुपयांचा महसूल सरकारला न मिळता सरकारच्याच नावाखाली खाजगी लोकांच्या खिशात जातोय याकडे आता प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

काही ठराविक ॲप बनवले जातात आणि हे ॲप कॉम्प्युटरच्या माध्यमातून ऑनलाईन लॉटरी धारकांना विकले जातात त्यापोटी पाच हजार ते तीस हजारापर्यंत ऍडव्हान्स पैसे घेतले जातात. दर आठवड्याला या ऑनलाइन लॉटरीचा हिशोब होत असतो सोमवारी सर्व हिशोब ऑनलाईन येत असल्यामुळे जो बॅलन्स असतो तो बॅलन्स वजाबाकी होत असतो कारण ऑनलाईन लॉटरी चालवण्यासाठी रोज मोबाईल रिचार्ज प्रमाणे बॅलन्स मारला जातो त्यामुळे “ढालो”हात नेहमीच मालामाल असतो.

ऑनलाईन लॉटरी कशी चालते पहा व्हिडिओ 👇

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular