अहिल्यानगर – माजी आमदार स्व.अरुणकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त काका ट्रस्टच्या वतीने स्व.अरुणकाका जगताप अन्नछत्रालय सुरु करण्यात आले आहे. मार्केटयार्ड जवळील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयाच्या समोरील नागेश्वर महादेव मंदिरात हे अन्नछत्रालय सुरु करण्यात आले आहे. बुधवार दि.२५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता या अन्नछत्रालयाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती काका ट्रस्टचे शशीकांत घीगे यांनी दिली.

अधिक माहिती देताना पूजा गोंडाळ यांनी सांगितले, स्व.अरुणकाका अन्नछत्रालयामध्ये गरजूंना दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत मोफत भोजन मिळणार आहे. या अन्नछत्राचा जास्तीत जास्त गरजूंनी रोज लाभ घ्यावा.
नगरसेवक विकी जगताप म्हणाले, अरुणकाका जगताप यांनी आयुष्यभर अन्नदान केले. त्यांच्या पाश्च्यात त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी हा उपक्रम सुरु करत आहोत. यासाठी काका ट्रस्टचे सर्व पदाधिकारी सहकार्य करत आहेत.
——————————-