Home शहर अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 880 रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ अरुणोदय...

अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 880 रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ अरुणोदय हॉस्पिटल हे रुग्णांसाठी आपले कुटुंब म्हणून काम करणार – डॉ. शशिकांत फाटके

अहमदनगर दि.२३ ऑक्टोबर-
अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ने गेल्या आठ दिवसांमध्ये मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा भरातून सुमारे 880 रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला याचबरोबर मोफत शिबिरामध्ये शस्त्रक्रिया करणारे अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल हे पहिले हॉस्पिटल ठरले आहे. सर्वसामान्य रुग्णांना डोळ्यासमोर ठेवून अरुणोदय हॉस्पिटल ने आरोग्य सेवा सुरू केली आहे आज बालरोग शिबिराच्या आयोजन केले होते लहान मुलांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहावे यासाठी आपल्या आई-वडिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे तसेच बालकाच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे बालक हे उद्याच्या देशाचे उज्वल भविष्य आहे यासाठी निरोगी व सदृढ बालक समाजामध्ये निर्माण करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे अरुणोदय हॉस्पिटल हे रुग्णांसाठी आपले कुटुंब म्हणून काम करीत राहील असे प्रतिपादन संचालक डॉ.शशिकांत फाटके यांनी केले.

अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत बालरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर प्रमुख उर्मिला पवार, अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त संजय शिंदे, भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीषकुमार देशमुख, हॉस्पिटलचे संचालक डॉ शशिकांत फाटके व डॉ वंदनाताई फाटके, जयंत येलूरकर,अभिजीत खोसे,जनक अहुजा,डॉ राहुल मुथा, डॉ विक्रांत पानसंबळ, डॉ.सचिन पानसरे,डॉ. सुप्रिया गुंजाळ, अजित जगताप, गोरख पडोळे, ॲड. अनुराधा येवले, प्रियंका आठरे आदी उपस्थित होते.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर प्रमुख उर्मिला पवार म्हणाल्या की अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ने मोफत आरोग्य शिबिरातून सर्वसामान्य रुग्णांना आधार देण्याचे काम केले आहे तज्ञ डॉक्टरांनी या मोफत शिबिराच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करण्याचे काम केले आहे अरुणोदय हॉस्पिटल हे नक्कीच रुग्णांच्या विश्वासाला पात्र राहील असे त्या म्हणाल्या.

एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ म्हणाल्या की ग्रामीण भागातील नागरिक आपल्या आजारपण अंगावर काढण्याचे काम करत असतात अरुणोदय हॉस्पिटल ने मोफत आरोग्य शिबिरातून या रुग्णांना आधार देण्याचे काम केले आहे अरुणोदय हॉस्पिटल हे रुग्ण सेवेतून नगर शहराचे नाव लौकिक करणार आहे त्या म्हणाल्या.
या शिबिराचे आभार प्रदर्शन संचालक डॉक्टर वंदनाताई फाटके यांनी केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version