नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी बडे बडे नेते, सेलिब्रिटी त्याच्या दरबारात हजेरी लावायचे.. त्याचा प्रभाव एवढा होता की काही जण तर चक्क त्याचे पायही धुवायचे. पण आता त्याचा पर्दाफाश झाला. तो नुसता भोंदू मांत्रिक नाही, तर त्याचा वासनांध चेहरा समोर आला. नाशिकच्या कॅनडा कॉर्नरसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये, कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याने त्याचं दुकान थाटलं होतं. आपल्याच कार्यालयात महिलेवर लैंगिक अत्याचार करताना हा विकृत भोंदूबाबा कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर या भोंदू मांत्रिकाची कुंडली जगासमोर आली. त्यामुळे वासनांध मांत्रिकाबरोबरच, त्याच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या नेत्यांचीही अडचण वाढल्याचं दिसतंय.
या अशोक खरात याचे अहिल्यानगर कनेक्शन उघड झाले असून शिर्डी येथे एका चोवीस वर्षीय महिलेला ब्लॅकमेल करण्याच्या आरोपा खाली अशोक खरात याच्या जाधव याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर नगर शहरातील काही भक्त नियमित नाशिक येथील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या कडे जात होती त्यांच्या कडून काही मोठी रक्कम खरात याने घेतल्याचे चर्चा असून ती परत भेटत नसल्याने नगर मधील तो माणूस गुन्हा दाखल करण्याच्या मानसिकतेत असतानाच कॅप्टन अशोक खरात याचा पर्दाफाश झाला असून अनेक धक्कादायक प्रकरण अशोक खरात यांच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अशोक खरातचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आरोपी धार्मिक विधीचा बहाणा करत महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवतो आणि त्यानंतर गैरवर्तन करतो, असं दिसून येते. हा व्हिडीओ अत्यंत आक्षेपार्ह असल्याने तो सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
