अहमदनगर 23 सप्टेंबर
नगरच्या अशोक लांडे खून प्रकरणात न्यायालयाने काँग्रेसचे तात्कालीन जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, त्याची तीन मुले माजी महापौर संदीप याच्यासह सचिन व अमोल यांना दोषी ठरवत या चौघांना जन्मठेप सुनावली. या प्रकरणातील अन्य आरोपी स्वप्निल पवार व वैभव अडसूळ यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती.
१९ मे २००८ रोजी मूळचा शेवगाव येथील लॉटरी विक्रेता असलेल्या अशोक भीमराज लांडे याचा केडगावमध्ये मारहाण करून खून करण्यात आला. पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्य़ाचीही दखल न घेतल्याने या घटनेचे साक्षीदार शंकरराव राऊत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर अखेर कोतवाली पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१३ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला पुढे नाशिक न्यायालयात वर्ग करण्यात आला. भानुदास कोतकर, नगरचे माजी महापौर संदीप कोतकर, सचिन व अमोल कोतकर यांच्यासह एकूण १५ जणांवर दोषारोपपत्र ठेवण्यात आले. नाशिकचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन सहा जणांना दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने भानुदास कोतकर व त्याच्या तीन मुलांना जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावलीh होती. पुरावे नष्ट केल्यावरून भानुदान कोतकरला तीन वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपयांचा दंड तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी स्वप्निल पवार आणि वैभव अडसूळ यांना दोषी धरत दोन वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती.
भानुदास कोतकर याला उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. त्यापाठोपाठ अमोल कोतकर यालाही जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर माजी महापौर संदीप आणि सचिन कोतकर दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. कालांतराने न्यायालयाने सचिन कोतकर याची जिल्हा बंदी उठवली आहे. तर अद्यापही भानुदास कोतकर अमोल कोतकर आणि संदीप कोतकर यांची जिल्हा बंदी उठवली गेली नाही मात्र नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव काळात संदीप कोतकर हे नगर शहर विधानसभा मतदारसंघातून उभा राहणार असल्याबाबतच्या सोशल मीडियावर पोस्ट फिरत होत्या तसेच शेवटच्या दिवशी संदीप कोतकर यांच्या मंडळाच्या वतीने मोठ शक्ती प्रदर्शन करत संदीप कोतकर यांचे मोठमोठे पोस्टर शहरात लावण्यात आले होते यावरून कोतकर यांची पुन्हा नगर शहराच्या राजकारणात आणि नगरमध्ये एन्ट्री होणार अशी चर्चा जोर धरू लागली होती. त्याच पार्श्वभूमीवर लांडे खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार शंकर राऊत हे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत त्यामुळे पुन्हा आता या प्रकरणात काही नवीन गोष्टी उघडकीस येणार का हेच पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.