Homeराजकारणनगर शहर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळणार महाराष्ट्र काँग्रेस विधानसभा निवडणुकीचे स्क्रिनिंग कमिटीचे...

नगर शहर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळणार महाराष्ट्र काँग्रेस विधानसभा निवडणुकीचे स्क्रिनिंग कमिटीचे चेअरमन मधुसूदनजी मिस्त्री यांची ग्वाही – मंगल भुजबळ प्रमुख दावेदार

advertisement

मुंबई दि.२२ सप्टेंबर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र काँग्रेस विधानसभा निवडणुकीचे स्क्रिनिंग कमिटीचे चेअरमन मधुसूदनजी मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी विभागातील इच्छुक उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक टिळक भवन, दादर,मुंबई येथे काँग्रेस पक्ष कार्यालयात आज पार पडली.या बैठकित मधुसूदन मिस्त्री यांनी ओबीसी प्रदेशअध्यक्ष भानुदास माळी यांना ओबीसी विभागातील चांगले काम करणारे व सक्षम असणारे इच्छुक उमेदवार मधील सिलेक्टेड उमेदवार व त्यांची संपूर्ण माहिती घेऊन नांवासह यादी पाठविणेबाबत सुचना केली तसेच ईच्छूक मधील सिलेक्टेड उमेदवारांना तिकिट मिळवून देण्यासाठी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे चेअरमन मिस्त्री यांनी सांगितले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की , अहमदनगर जिल्हयात विधानसभेच्या 12 जागा असून ओबीसी समाजाची संख्या जिल्ह्यात जास्त असल्याने या जिल्ह्यात काँग्रेसकडून एक ओबीसी उमेदवार नक्कीच दिला जाईल तो ओबीसी उमेदवार देण्याची जबाबदारी माझी असेल असे स्पष्टपणे त्यांनी सांगून एकप्रकारे नगर शहराची जागा काँग्रेसचं लढवेल असे संकेत त्यांनी दिले यावेळी काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले साहेब,खासदार प्रणिती शिंदे, खासदार ऍड.गोयल पाडवी, खासदार डॉ. नामदेव किरसाण साहेब,माजी मंत्री अमित देशमुख साहेब,माजी आमदार के सी पाडवी, आमदार शिरीष नाईक साहेब,ओबीसी प्रदेशअध्यक्ष भानुदास माळी साहेब,ओबीसी राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ व ओबीसी विभागातील ईच्छूक सर्व उमेदवार उपस्थित होते….

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular