Home शहर अतिक्रमण हटाव मोहिम…तीव्र करा..शहराचा झालाय खेळ खंडोबा…रस्ते गायब टपऱ्या हातगाड्या याच अतिक्रमणांचे...

अतिक्रमण हटाव मोहिम…तीव्र करा..शहराचा झालाय खेळ खंडोबा…रस्ते गायब टपऱ्या हातगाड्या याच अतिक्रमणांचे शहरात राज्य…

अहिल्या नगर दिनांक २९ नोव्हेंबर
नगर शहरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिकेने तीव्र कारवाई करावी आणि शहरात असलेली अतिक्रमणे काढून टाकावीत कारण शहरातून दुचाकी अथवा चार चाकी वाहन चालताना मोठी तारेवरची कसरत करत नगर शहरात गाडी चालवावी लागते. त्याचप्रमाणे पायी चालणाऱ्या नागरिकांनाही या अतिक्रमणांचा मोठा त्रास होत असून रस्ते गायब झाले असून रस्त्यावरच अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली दिसून येतात नगर शहरातील माळीवाडा बस स्टँड पासून सुरू झालेली अतिक्रमणे थेट सावेडी पर्यंत पोहचली आहेत.

माळीवाडा,पांचपिर चावडी,आशा टॉकीज चौक, कापड बाजार,तेलीखुंट, चितळे रोड, चौपाटी कारंजा दिल्ली गेट तसेच सर्जेपुरा,लालटाकी, डाळमंडई, प्रोफेसर कॉलनी चौक एकविरा चौक श्रीराम चौक झोपडी कॅन्टीन अशा अनेक ठिकाणी रस्त्यावरच अतिक्रमणे करून मोठ्या थाटात टपऱ्या टाकण्यात आलेल्या आहेत. आशा अतिक्रमणांमुळे पायी चालणे मुश्किल होते त्याचबरोबर दुचाकी आणि चार चाकी वाहने चालवणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे आहे. मात्र महापालिका याकडे दुर्लक्ष का करते हे समजायला तयार नाही.

नगर शहरात तर अनाधिकृत पत्र्यांचे शेड उभारून ते भाड्याने देण्याचा नवा फंडा सुरू असून सुरू या टपऱ्यांच्या शेडला कोणत्याही अधिकृत परवाना नसतानाही खुलेआम पणे अशा टपऱ्या टाकून त्या भाड्याने देण्याचे प्रकार सुरू आहेत. पाईपलाईन रोड यशोदा नगर, बालिकाश्रम रोड, तपोवन रोड, त्याचप्रमाणे पारिजातक चौकातील पत्रांच्या अनधिकृत टपऱ्या असून या ठिकाणी अनेक परप्रांतीय नागरिक येऊन व्यवसाय करत आहेत.

दिल्ली गेटवेस म्हणजे अतिक्रमणांनी वेढलेली वेस झाली असून या ठिकाणी मंदिर आणि त्या ठिकाणी सुरू असलेले व्यवसाय यामुळे पायी चालणेही मुश्किल होते. हीच परिस्थिती कापड बाजार आणि चौकटी कारंजा येथे आहे. प्रोफेसर कॉलनी चौक परिसराला तर अतिक्रमणांचा विळखा पडत चालला असून या ठिकाणी खाद्यपदार्थ विकणारे दुकानदारांचे मोठे मोठे गाळे आहेत मात्र ते गाळे सोडून दुकाना बाहेर हातगाड्या टाकून अतिक्रमण करून येथे व्यावसाय सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी रात्री पायी चालणे मुश्किल होते. हीच परिस्थिती एकविरा चौक आणि भिस्तबाग चौकातही आहे.

राज चेंबर परिसरात तर रस्ता कमी आणि अतिक्रमणे जास्त दिसतात या ठिकाणी मोठमोठे हॉटेल्स आहेत मात्र हे हॉटेल थेट रस्त्यावरच थाटले आहेत. या ठिकाणी रस्ता भिंग घेऊन शोधावा लागतो अशी परिस्थिती असून या ठिकाणी दिवसभर वाहतुकीचा खोळंबा झालेला असतो.चहाच्या टपऱ्या आणि हॉटेलची अतिक्रमने यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे आता महानगरपालिकेने अतिक्रमण मोहीम तीव्र करून शहरातील अनधिकृत अतिक्रमणे असलेल्या टपऱ्या काढून टाकाव्यात आणि नगर शहराचा श्वास मोकळा करावा अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे. मात्र ही अतिक्रमणे काढताना कोणताही भेदभाव न करता अतिक्रमण काढावेत मोठ मोठे हॉटेल्स हॉस्पिटल्स या ठिकाणीही पार्किंग नसल्यामुळे त्या परिसरातील वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जातात त्यामुळे ही मोठी अडचण निर्माण होते अशा हॉटेल आणि हॉस्पिटलवरही कारवाई करावी अशी मागणी आता नागरिक करू लागले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version